घरमहाराष्ट्रशिवसेनेत उरले कोण?, 55 आमदारांपैकी उरले केवळ 10 आमदार

शिवसेनेत उरले कोण?, 55 आमदारांपैकी उरले केवळ 10 आमदार

Subscribe

सध्या एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे 41 आमदार आणि अपक्ष सहा असे एकूण 47 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. पण अजूनही अनेक आमदार शिंदेंच्या गोटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत

मुंबईः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. एकनाथ शिंदेंच्या गोटात दिवसागणिक आमदार वाढत चालले आहेत. सध्या एकनाथ शिंदेंच्या गोटात जवळपास 41 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार शिल्लक राहिले आहेत.

शिवसेनेचे मालाड मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू, राजापूरचे आमदार राजन साळवी, चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर, विक्रोळीचे आमदार सुनील राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक, भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर, पाचोऱ्याचे आमदार कैलास पाटील, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हेच शिल्लक राहिले आहेत. इतर सर्व आमदार जवळपास शिंदेंच्या गोटात सामील झाले आहेत. तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदेंच्या तंबूत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

सध्या एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे 41 आमदार आणि अपक्ष सहा असे एकूण 47 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. पण अजूनही अनेक आमदार शिंदेंच्या गोटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटात महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून मंत्री असलेले अनेक जण सहभागी झाले आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासारखे अनेक मंत्री सहभागी झाले आहेत.

दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर पायउतार होण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील त्यांचे वर्षा अधिकृत निवासस्थान रिकामे केले आणि वांद्रे येथील त्यांच्या खासगी मातोश्री निवासस्थानी राहायला गेले. दोन दिवसांपूर्वी शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी हे पाऊल उचलले असून, बंडखोर आमदारांच्या भूमिकेतही बदल होत नाहीये हे लक्षात घेण्यासारखे आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंबरोबरचे आमदार

१) महेंद्र थोरवे (कर्जत)

२) भरत गोगावले (महाड)

३) महेंद्र दळवी (अलिबाग)

४) अनिल बाबर (खानापूर)

५) महेश शिंदे (कोरेगाव)

६) शहाजी पाटील (सांगोळा)

७) शंभूराज देसाई (पाटण)

८) बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)

९) ज्ञानराजे चौघुले (उमरगा)

१०) रमेश बोरणारे (विजापूर)

११) तानाजी सावंत (परांडा)

१२) संदिपान भुमरे (पैठण)

१३) अब्दुल सत्तार (सिल्लोड)

१४) नितीन देशमुख (अकोला)

१५) प्रकाश सुर्वे (मागाठणे)

१६) किशोर पाटील (जळगाव)

१७) सुहास कांदे (नांदगाव)

१८) संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)

१९) प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)

२०) संजय रायुलकर (मेहकर)

२१) संजय गायकवाड (बुलढाणा)

२२) एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)

२३) विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)

२४) राजकुमार पटेल (मेळघाट)

२५) शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)

२६) श्रीनिवास वनगा (पालघर)

२७) प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)

२८) प्रकाश अबिटकर (राधानगरी)

२९) चिमणराव पाटील (एरंडोल)

३०) नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)

३१) लता सोनावणे (चोपडा)

३२) यामिनी जाधव (भायखळा)

३३) बालाजी किनीकर (अंबरनाथ)

३४) गुलाबराव पाटील (जळगाव)

३५) योगेश कदम (दापोली)

३६) दीपक केसरकर (सावंतवाडी)

३७) सदा सरवणकर (माहीम)

३८) मंगेश कुडाळकर (कुर्ला)

३९) दिलीप लांडे (चांदिवली)

४0) संजय राठोड (यवतमाळ)

शिवसेनेत असलेले आमदार

सुनील प्रभू (मालाड)

राजन साळवी (राजापूर)

प्रकाश फातर्पेकर (चेंबूर)

सुनील राऊत (विक्रोळी)

वैभव नाईक (कुडाळ-मालवण)

आदित्य ठाकरे (वरळी)

रमेश कोरगावकर (भांडुप)

कैलास पाटील (पाचोरा)

नितीन देशमुख ( बाळापूर)

अजय चौधरी (शिवडी)

राहुल पाटील (परभणी)

संतोष बांगर (हिंगोली)

भास्कर जाधव (गुहागर)

सुजित मिणचेकर (हातकणंगले)

रवींद्र वायकर (जोगेश्वरी)

संजय पोतनीस (कलिना)


हेही वाचाः आता महाराष्ट्रातील राज्यपालांची भूमिका काय? सर्वांच्या नजरा फ्लोअर टेस्टकडे

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -