मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे…, कसाबचा दाखला देत विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण

मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे…, कसाबचा दाखला देत विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण

मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे..., कसाबचा दाखला देत विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण

Vinod Tawade explained |मुंबई – माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Former Education Minister Vinod Tawade) अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढणार होते, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी केला होता. यावरून भाजपा नेते विनोद तावडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी आज एक व्हिडीओ प्रसारित करत मुघलांचा इतिहास काढणं म्हणजे शिवाजी महाराजांचं शौर्य काढण्यासारखं नाही असं ते म्हणाले.

हेही वाचा – …तर रावण काढून रामायण समजावून सांगा, जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम!

विनोद तावडे म्हणाले की, “मी मुघलांचा इतिहास काढणार होतो असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास काढणार नाही. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे याचा अर्थ अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे शिकवणं बंद करणार. मुघलांच्या काळात स्थापत्यशासन खूप चांगलं होतं, त्यांनी कलेला आश्रय दिलं, असं नाही. आधीच्या काळातही असं होतं. अकबर दि ग्रेट ज्याने लाखो हिंदूंची कत्तल केली. ते शिकवणं काढणार. शिवाजी महाराज कुशल प्रशासक होते हे सांगितलं, त्यांचं शौर्य काय आहे हेही सांगितलं.”

“मला जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक कळत नाही की शाहिस्तेखान शिकवला म्हणजे शिवाजी महाराजाचं शौर्य कळतं. त्यांना असं म्हणायचं आहे का कसाब आला म्हणून करकरे, कामटेआणि ओमाळेंचं शौर्य दिसलं? ते आधीपासूनच शूर होते, त्यासाठी कसाबला येण्याची गरज नव्हती. तरीसुद्धा मला म्हणायचं की मुघलांचा इतिहास म्हणजे कुतुबाशाही, आदिलशाही शिकवणं बंद झाली पाहिजे,” असंही त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

एमपीएससीच्या परीक्षेतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा विषयच काढून टाकला. विनोद तावडेंनी जाहीर केलं होतं की मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

हेही वाचा “मुघलांचा पुळका असेल तर चालते व्हा पाकिस्तानला…” निलेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका

First Published on: February 6, 2023 5:05 PM
Exit mobile version