घरमहाराष्ट्र...तर रावण काढून रामायण समजावून सांगा, जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम!

…तर रावण काढून रामायण समजावून सांगा, जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम!

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यभरात गदारोळ सुरू असतानाच त्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी आज पुन्हा ट्वीट करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

विनोद तावडे म्हणाले होते की, इतिहासातून मुलघांचा इतिहास काढून टाकणार. मग शिवाज महाराज काय गोट्या खेळले दाखवणार का? असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी काल पुण्यातील आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात केले होते. त्यानंतर समस्त शिवप्रेमींनी आणि भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली. परंतु, जितेंद्र आव्हाडांनी आपले शब्द मागे घेतले नसून मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आज एक ट्वीटही केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, पवारांनंतर आव्हाडांची जीभ घसरली

रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिल शाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं उपरोधिक ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी आज केले आहे.

- Advertisement -


जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

एमपीएससीच्या परीक्षेतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा विषयच काढून टाकला. विनोद तावडेंनी जाहीर केलं होतं की मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

निलेश राणेंची चपराक

जितेंद्र आव्हाड, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा, मुंब्रातून निवडून येण्यासाठी तुम्ही हिंदू धर्म विकला आहे हे आम्हाला माहीत आहे, मुघलांचा पुळका असेल तर चालते व्हा पाकिस्तानला, असं ट्वीट भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केलं आहे.


औरंगजेब क्रूर नव्हता – जितेंद्र आव्हाड

“संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही त्याने फोडलं असतं,” असं जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यांच्या या वाक्यावरूनही राज्यात बरेच घमासान झाले. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांची भूमिका स्पष्ट करण्याकरता जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत औरंगजेबाचे समर्थन करत त्यांनी स्वतःहून नवा वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे अजित पवारांसह जितेंद्र आव्हाडही सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

हेही वाचा – औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय…; चित्रा वाघ जितेंद्र आव्हाडांवर संतापल्या

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -