Monday, May 13, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : त्वचा आणि केसांवर दही कसे लावायचे ?

Beauty Tips : त्वचा आणि केसांवर दही कसे लावायचे ?

Subscribe

सर्वच ठिकाणी जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दह्याचा वापर हा प्रत्येकवेळी केला जातो. अशातच त्वचेवर आणि केसांवरही दह्याचा वापर केल्याने अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. याचे कारण दह्यामध्ये आवश्यक पोषक तत्वे आढळतात. तसेच केस आणि त्वचेवर दही लावल्यास काय परिणाम होतात हे आपण आता जाणून घेऊया. यासोबतच केसांवर आणि त्वचेवर दह्याचा कसा वापर करायचा हे थोडक्यात जाणून घेऊया…

त्वचेवर दही कसे वापरावे?

- Advertisement -
  • सगळ्यात आधी दह्यात बेसन आणि चिमूटभर हळद घाला.
  • अंघोळ करण्यापूर्वी हे मिश्रण 15-20 मिनिटे शरीराला लावून ठेवा.
  • हे लावून झाल्यावर त्वचेला हलके ओले करा आणि हलक्या हाताने चोळा.
  • हे करून झाल्यावर शेवटी स्वच्छ अंघोळ करा.

अशाप्रकारे बनवा दह्यापासून स्क्रब

  • तेलकट त्वचेला स्क्रब करणे फायदेशीर आहे.
  • तुम्हाला बाजारातून महागडे स्क्रब खरेदी करण्याची गरज नाही.
  • तुम्ही दह्याने फेस स्क्रब बनवू शकता. स्क्रब बनवण्यासाठी तांदळाच्या पिठात दही आणि चिमूटभर हळद मिसळा.
  • आता हा स्क्रब त्वचेवर लावा आणि हलक्या हातांनी चेहरा पाण्याने धुवा.

 

- Advertisement -

दही फेस मास्क कसा बनवायचा

  • दह्यापासून फेस मास्क देखील बनवता येतो.
  • फेस मास्क बनवण्यासाठी एक चमचा बेसन, एक चमचा मध, अंड्याचा पांढरा बलक आणि त्यात दही मिसळा.
  • आता या सर्व गोष्टी नीट मिसळा. ही पेस्ट नीट चेहऱ्यावर लावा.
  • आता 20 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

त्वचेवर दही लावल्याने ‘हे’ होतात फायदे

  • जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही दररोज चेहऱ्यावर दही वापरू शकता.
  • केवळ तेलकटच नाही तर जर कोणाला मुरुमांची समस्या असल्यास त्यांनी देखील चेहऱ्यावर दह्याचा वापर करावा.
  • दह्यामध्ये आम्ल-अल्कलाईन नावाचा आंबट पदार्थ असतो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

केसांमध्ये दही कसे वापरावे?

  • केसांसाठी दही हा अतिशय प्रभावी मार्ग आहे.
  • अशातच शॅम्पू करण्यापूर्वी केसांना दही लावा.
  • दही वापरल्याने केसांना प्रोटीन मिळते. केसांच्या कंडिशनिंगसाठी दह्याचा वापर करा.
  • जर तुमचे केस कोरडे असतील तर केसांमध्ये दही वापरावे. यामुळे केस मऊ होतात.

केसांवर दही लावण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • केस मऊ करण्यासाठी महागडे शाम्पू वापरून कंटाळले असाल, तर केसांमध्ये दही वापरावे.
  • अशातच दह्याच्या वापरामुळे केस स्मूथ तर होतात तसेच केस फ्रीजी होत नाहीत.
  • तसेच जर तुमच्याकडे केसांना कंडिशनिंग करण्यासाठी स्पामध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर केसांना दही लावा.
  • त्यामुळे दही लावल्याने टाळू स्वच्छ राहते.
  • जर टाळू स्वच्छ असेल तर तुमचे केस देखील चांगले राहतील.

________________________________________________________________________

हेही वाचा :

रात्री चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini