Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealth'या' पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका दही

‘या’ पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका दही

Subscribe

दह्याचे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला भरपूर प्रमाणात आरोग्यदायी लाभ मिळतील. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यापासून ते हृदयाचे आरोग्य जपण्यापर्यंत कित्येक औषधी गुणधर्मांचा दह्यामध्ये समावेश आहे. दह्याद्वारे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वांचा पुरवठा होतो.परंतु दही खाल्ल्यानंतर इतर वेगळा पदार्थ खाल्ल्यास किंवा चुकीच्या वेळात दही खाल्ल्यास शरीरात विष तयार होत आहे.

दह्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे शरीर मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. दह्यात बरेच हेल्दी बॅक्टेरिया आढळतात, जे पचनाक्रियेसंबंधीत आजार दूर करण्यास उपयुक्त ठरतात. तसेच दह्यात लॅक्टिक अँसिड, व्हिटॅमिन बी -6, बी -12, लोह, कॅल्शियम, राइबोफ्लेविनसारखे पोषण घटक असतात जे शरीरास रोगांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात.

- Advertisement -

दह्याचे सेवन कोणत्या वेळी करावे?

दही खाण्याची सर्वांत योग्य वेळ म्हणजे सकाळ किंवा दुपार आहे. सकाळच्या नाश्तामध्ये एक वाटी दह्यांत साखर मिसळून खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर होते. दही हे शरीरासाठी थंड असले तरी रात्रीच्या वेळी दही खाल्ल्यास कफ, खोकला आणि सर्दी होऊ शकते.

What is the difference between 'Dahi' and 'Yoghurt' | by Gijo Vijayan |  Medium

- Advertisement -

रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन केल्यास लठ्ठपणा आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. दह्यामध्ये पित्त आणि कफ वाढविणारे घटक असतात. त्यामुळे त्याचे बेतात सेवन केले पाहिजे. तसेच दही नेहमीच दिवसा खावे.

दह्यासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नये

Top 5 types of curd setters in the market - Ellementry

  • हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, दूध आणि दही कधीही एकत्र खाऊ नये. कारण यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
  • दह्याबरोबर कधीही फळं देखील खाऊ नयेत.
  • दही आणि मीठ एकत्र खाल्ल्यास ब्लड प्रेशचा त्रास वाढतो.
  • तळलेले पदार्थ आणि दही एकत्र खाणेही हानिकारक मानले जाते.

हेही वाचा :

आहारात कडधान्यांचा समावेश करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini