घरलाईफस्टाईलत्वचा उजळण्यासाठी 'या' फळांच्या सालींचा करा वापर

त्वचा उजळण्यासाठी ‘या’ फळांच्या सालींचा करा वापर

Subscribe

फळांसोबतच फळांच्या साली त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.

आपण सगळेचजण बरीच फळे खातो पण फळांच्या साली खात नाही. तसेच फळांची ताकद त्यांच्या सालींमध्येही असते. पण तुम्हाला माहित आहे का ? फळांसोबतच फळांच्या साली त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. जशी फळे आपल्या आरोग्यसाठी चांगली असतात. तशीच फळाची साल आपल्या निरोगी त्वचेसाठी खूप उपयुक्त असते. आपले पोट जर का साफ नसेल तर त्वचा देखील त्यामुळे खराब होत असते. त्यामुळे आपल्या आहारात कोण कोणती फळे असायलात हवीत आणि कोणत्या फळांची साल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. तसेच आता आपण फळांच्या सालीने त्वचेच्या समस्यांपासून कशी सुटका मिळवतात येईल हे पाहणार आहोत.

3 Ways to Use Up Fruit and Vegetable Peels - Great British Chefs

- Advertisement -

1. पपईची साली

पपईमध्ये एन्झाइम नावाचा घटक असतो जो त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवत नाही तर मृत त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करतो. पपईची साल नियमितपणे त्वचेवर लावली तर त्वचेवरचे डाग दूर करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबतच पपईच्या सालीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटिबॅटेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेवर जळजळ होत असेल तर ती बंद होते.

2. केळीची साल

केळीच्या सालीमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि एन्झाइम्स तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. जर तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून कंटाळतात असाल तर केळ्याची साल तुम्हाला मदत करू शकते. तसेच केळीची साल त्वचेला आर्द्रता पोहचवतात ज्यामुळे सुरकुत्या कमी दिसतात.  याशिवाय, त्वचेची पोत सुधारते आणि त्यात चेहऱ्याला छान चमक येते. तसेच यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मुरुमांच्या समस्येपासून आराम देऊ शकतात.

- Advertisement -

3. संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीच्या नावाखाली आपण अनेकदा चेहऱ्यावर रासायनिक पदार्थ लावतो. पण जर का तुम्ही चेहऱ्याला संत्र्याची साल लावली तर त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणार नाहीत. संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे त्वचा डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय,संत्र्याच्या सालीत भरपूर आर्द्रता देखील असते. ही साल चेहऱ्याला लावल्याने कोरड्या त्वचेला जिवंतपणा येतो. तसेच संत्र्यांचे मास्क तुम्ही नियमितपणे लावलीत तर चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे सुरकुत्या पडत नाही.

4. बटाट्याची साल

बटाट्याच्या मास्कची सध्या बाजारात आवाक सुरु आहे. पण बाजारातून महागडे मास्क विकत घेण्यापेक्षा बटाट्याची साल थेट चेहऱ्यावर लावणे कधीही चांगले. तसेच बटाटयाच्या सालीच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करू शकता. पण जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर बटाटयाची साल थेट चेहऱ्यावर लावण्याऐवजी त्यात मध मिसळून त्याची पेस्ट बनवून मास्क बनवा. बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, फॉस्फरस आणि सल्फर इत्यादीमुळे त्वचेवरील डाग दूर होतात.

________________________________________________________________________

हेही वाचा :  नॅचरल ग्लो हवाय? मग बटाट्याचा 5 पद्धतीने करा वापर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -