Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthWeight Gain Tips : या घरगुती उपायांनी वाढवा वजन

Weight Gain Tips : या घरगुती उपायांनी वाढवा वजन

Subscribe

आजकाल बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत, परंतु असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या सडपातळ शरीरामुळे त्रस्त आहेत. अशा लोकांचे शरीर आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांचे भरपूर खाऊन पिऊनही वजन वाढत नाही. जर तुमची तब्येत सुधारत नसेल, तुमचे वजन वाढत नसेल, तुम्ही खूप कमकुवत आणि बारीक असाल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. निरोगी जीवनशैली, काही घरगुती उपाय आणि व्यायामाने तुम्ही वजन वाढवू शकता.

बटाटा

बटाट्यात सर्वाधिक प्रमाणात स्टार्च असतं. या शिवाय, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि झिंकदेखील त्यात आढळतं. वजन वाढवण्यासाठी बटाटे फायदेशीर आहेत, पण ते जास्त खाऊ नये आणि घाईत चावूही नये. शक्यतो तळलेला बटाटा खाणे टाळा. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

- Advertisement -

भिजवलेले काळे चणे, खजूर

काळे चणे वजन वाढवण्यास मदत करतात. काळ्या चण्यांमध्ये प्रोटीन्स असतात. रोज रात्री थोडे काळे चणे भिजवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. काळ्या चण्यासोबत खजूर खाल्ल्यानेही फायदा होतो. दूधात खजूर उकळून ते दूध पियाल्यानेही फायदा होतो. यामुळे काही दिवसांत वजन वाढण्यास मदत होईल.

अंडी

वजन वाढवण्यासाठी अंडी खाणं फायदेशीर ठरू शकतं. अंड्यांमध्ये प्रोटीन, फॅट्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. अंडी वेगाने वजन वाढण्यात मदत करतात. ड्यांबरोबर आहारात मटण, चिकन आणि मासे यांचाही समावेश करू शकता.

- Advertisement -

झोप 

भरपूर झोप घ्या. दररोज 7 ते 8 तासांची झोप घेतल्याने वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसतो. त्यामुळे पुरेशी झोप गरजेची आहे.

हेल्दी फॅट आवश्यक

वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात जास्त फॅट असलेल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही शेंगदाणे, तीळ, बदाम, अक्रोड, पिस्ता, सूर्यफुलाच्या बिया, जवस, खरबूज यांचे सेवन करू शकता. तेलामध्ये, तुम्ही तेलासाठी मोहरी, ऑलिव्ह, सूर्यफूल, तीळ, तूप किंवा खोबरेल तेल वापरू शकता.

______________________________________________________________

हेही वाचा : Heat Stroke :उष्माघात टाळण्यासाठी अवश्य खावीत ही फळे

- Advertisment -

Manini