घरमहाराष्ट्रChitra Wagh : एक अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या मोठ्ठ्या ताई..., चित्रा...

Chitra Wagh : एक अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या मोठ्ठ्या ताई…, चित्रा वाघांकडून सुप्रिया सुळे लक्ष्य

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बारामती लोकसभेतून निवडणूक लढण्यावरही ठाम असल्याचे शिवतारे यांनी जाहीर केले होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवतारे यांची समजूत काढली. त्याचा फोटो शेअर करत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Maha Politics : अमरावतीचे राजकारण तापले, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ बंडाच्या तयारीत

- Advertisement -

महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. परंतु, तेथून निवडणूक लढविण्याची मागणी विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आली. पण याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने शिवतारे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण त्यांनी घेतलेला हा निर्णय पक्षाच्या आणि महायुतीच्या विरोधातील असल्याने निर्वाणीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तविली जात होती.

- Advertisement -

मात्र, विजय शिवतारे यांनी काल, बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघल्याचे बोलेल जात आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय येथे झालेल्या बैठकीत शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते. आज, गुरुवारी विजय शिवतारे पत्रकार परिषद घेत पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

हेही वाचा – Politics: मुख्यमंत्र्यांचे कपडे घालून फिरतात तेच चिक्कार; राऊतांचा शिंदेंना टोला

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. एक अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या मोठ्ठ्या ताई (सुप्रिया सुळे) आगे आगे देखिए होता है क्या, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: …म्हणून त्यांना उसन्या भाटांची गरज पडली नाही; अंबादास दानवे यांची शिवसेनेवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -