काजळ हे सर्व मुलींचे आवडते मेकअप प्रॉडक्ट आहे. मुलींना काजळ रोज लावायला आवडतं. मात्र, काही तासांनंतर काजळ पसरल्यामुळे त्रास होऊ शकतो. हा त्रास वाचवण्यासाठी काजळ लावताना काही टिप्सचा वापर करावा. तसेच अनेकजणी काजळ तर लावतात पण ते योग्यरित्या लावण्याची पद्धत त्यांना माहीत नसते. त्यामुळे जर तुम्ही रोजच्या रोज काजळ वापरत असाल तर तुम्हाला ही पद्धत माहिती असायलाच हवी.
- काजळ लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून नीट कोरडा करा.
- पाण्यामुळे डोळ्यांमध्ये व आजूबाजूला ओलावा निर्माण होतो, तो भाग नीट पुसावा.
- त्यानंतर काजळ लावल्यास मॅट फिनिश लूक मिळतो आणि काजळ कमी पसरतं.
- जर तुमची त्वचा तेलकट आहे आणि डोळ्याच्या आसपासची तेलकट त्वचा स्वच्छ करायची असेल तर फेस पावडरचा वापर करा.
- बऱ्याचदा मुली काजळ हे वॉटर लाइनवर लावतात.
- अशातच काजळ वॉटर लाइन ऐवजी ते आपल्या लॅश लाइनवर म्हणजे जिथे आपल्या पापण्या असतात, तिथे काजळ लावावे.
- काजळ पसरण्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण असते ते म्हणजे डोळ्यांतील ओलावा आणि येणारा घाम.
- त्यामुळे जेव्हा तुम्ही काजळ लावून बाहेर पडाल तेव्हा डोळ्यांखालील भाग एखाद्या कॉटनच्या कापडाने डीप करत रहा, म्हणजे घाम पुसता येईल.
- काजळ लावल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा काजळ लावा.
- असं केल्याने काजळ बराच वेळ राहील आणि डोळ्यांना आकर्षक लुक मिळेल.
- जर तुमचे डोळे छोटे असतील तर डोळ्याच्या वॉटरलाईन खाली काजळ लावा. त्यामुळे डोळे मोठे दिसतील.
- तसेच डोळ्यांना सारखा हात लावू नका. यामुळे डोळ्यात पाणी येते आणि काजळ बाहेर येत राहते.
- अशामुळे चेहरा खराब होतो आणि काजळ दीर्घकाळ टिकत नाही.
हेही वाचा : ‘या’ ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये असतात केमिकल्स, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -