घर देश-विदेश मतदारांना पुन्हा हवे आहेत पंतप्रधान म्हणून मोदीच; वाचा- कोणत्या सर्व्हेतून आली माहिती...

मतदारांना पुन्हा हवे आहेत पंतप्रधान म्हणून मोदीच; वाचा- कोणत्या सर्व्हेतून आली माहिती समोर

Subscribe

पुढील काही महिन्यांत देशातील मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. तर विरोधी पक्षांनी इंडिया गटाने इंडिया आघाडी उघडली असून, आतापासूनच देशातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यासाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. तर अशातच एबीपी आणि सी वोटर्सने केलेल्या सर्व्हेतून राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यापैकी कोणाला पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल असे विचारले असता मतदारांनी पुन्हा एकदा मोदींनाच सर्वाधिक पसंती दिली आहे.(Voters want Modi as Prime Minister again Read the information from which survey is revealed)

पुढील काही महिन्यांत देशातील मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशाच्या पुढील पंतप्रधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल? असे विचारले असता मतदारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आता राहुल गांधी आम्हाला शिकवतील का चीनचे काय करायचे तर; केंद्रीय मंत्र्याचा कॉंग्रेसला प्रत्युत्तर

दुसऱ्या पसंतीचे राहुल गांधी यांना मते

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 71 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचे नाव घेतले आहे. तर 24 टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले आहे. 4 टक्के लोक म्हणतात की दोघांपैकी कोणीही नाही आणि 1 टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा : कायदेशीररित्या विवाहित नसली तरी मृत पतीच्या सेवालाभास दुसरी पत्नी पात्र – आंध्र प्रदेश हायकोर्ट

एवढ्या जणांनी घेतला सर्व्हेमध्ये सहभाग

‘एबीपी’ आणि ‘सी व्होटर्स’ने छत्तीसगढमध्ये सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत 11 लोकसभा आणि 90 विधानसभा क्षेत्रातील जनतेची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यामध्ये 18 वर्षांवरील 7 हजार 679 जणांनी सर्व्हेत भाग घेतला होता. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना जनतेने सर्वाधिक पसंती दिली आहे. तर, दुसऱ्या क्रमाकांवर राहुल गांधींना जनतेनं पसंती दिली आहे.

- Advertisment -