Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनPrajakta Mali : प्राजक्ता माळीचा जबरदस्त वेटलॉस फंडा

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा जबरदस्त वेटलॉस फंडा

Subscribe

प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘सुवासिनी’ , ‘जुळून येती रेशीमगाठी’ इत्यादी मालिकांमध्ये प्राजक्ताने काम केले आहे. तसेच आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमोहक अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. प्राजक्ता माळी तिच्या कामाबरोबर तिच्या फिटनेसकडेही जास्त लक्ष देते. सुदृढ आणि सुडौल शरीराकरता काही नियम फॉलो करते. हे सगळे नियम, अटी टिप्सच्या स्वरूपात प्राजक्ता माळीने शेअर केल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये ती स्वतःला कशी तंदुरुस्त ठेवते आणि त्यासाठी काय काय करते हे तिने सांगितलं होतं.

अष्टांग योगा :

प्राजक्ता आहारासोबतच योगा आणि व्यायामाला तितकेच महत्व देते. एका मुलाखतीमध्ये बोलताना प्राजक्ताने सांगितले होते की, अष्टांग योगा केल्याने चेहर्‍याची स्किन, शरीर फिट ठेवणे, मनाला आणि शरीराला अंतर्बाह्य संतुलित करणे हे सगळं साध्य केलं जाऊ शकतं. अष्टांग योगा हा शरीरातल्या सगळ्या अवयवांना योग्य वळण देणारा एक चांगला व्यायामप्रकार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

- Advertisement -

 प्राजक्ताचा डाएट :

आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या आहाराला खूप महत्व आहे. वजन कमी करणे, शरीर निरोगी असणे इतकंच काय तर आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी सुद्धा आपण घेतलेला आहार आपल्याला खूप मदत करतो. प्राजक्ता माळी रोज पुढीलप्रमाणे डाएट रुटीन फ़ॉलो करते. व्यायामासोबतच आपला आहार देखील महत्वाचा आहे असे प्राजक्ता मानते.

नाश्ता
प्राजक्ता सकाळी उठल्यावर सुरूवातीला 2-3 ग्लास गरम पाणी पिते. त्यानंतर ती एक फळ खाते. फळ खाल्यानंतर जवळपास 2 तासांनी प्राजक्ता पोटभर नाश्ता करते.

- Advertisement -

दुपारचे जेवण
प्राजक्ता दुपारच्या जेवणामध्ये घरच्या जेवणाला प्राधान्य देते. तिच्या दुपारच्या जेवणामध्ये, एक ते दीड चपाती, हिरवी पालेभाजी, वरण किंवा कडधान्ये यांचा समावेश असतो.

संध्याकाळचा चहा
प्राजक्ताला चहा प्रचंड आवडतो. मात्र, त्यात साखर न घालता ती गूळ घालते. गूळ घातलेला चहा प्यायला तिचं प्राधान्य असतं. तसेच साखर सोडावी आणि साखरेचा चहा कधी घेऊ नका त्याऐवजी गूळ घालून चहा प्या.

रात्रीचे जेवण
संध्याकाळचा चहा झाल्यानंतर प्राजक्ता रात्रीचे जेवण साधारणपणे आठ किंवा साडेआठच्या दरम्यान घेते. यावेळी ती पोळी-भाजी खाण्यावर भर देते.

प्राजक्ताच्या फिटनेस टीप्स :

नियमित व्यायाम करा
प्राजक्ता सांगते की, जर तुम्हाला फिट रहायचं असेल आणि वजन वाढू द्यायच नसेलं तर तुम्ही नियमित व्यायाम, योगा हा केलाच पाहिजे.

रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा
नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप ही निरोगी आरोग्याची यशस्वी त्रिसूत्री आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि फिट रहायचं असेल तर, झोप देखील पुरेशी प्रमाणात घेणं गरजेचं आहे.

जंकफूड टाळा
जंकफूड हे प्रत्येकालाच खायला आवडतं. मात्र, हे जास्त प्रमाणात खाल्लं तर याचे घातक परिणाम आपल्या शरिरावर होतात. परिणामी मग वजन वाढण्याची आणि फॅट्सची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जंक फूड सोबतच कोल्ड्रिंक, पॅकेज फूड, मैदा असं काहीही खाऊ नका, असा सल्ला ही प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना दिला आहे.

_______________________________________________________________

हेही वाचा : Photo : सोनम कपूर विचित्र लूकमुळे होतेय ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -