Friday, April 26, 2024
घरमानिनीDiaryDairy: आमचं शाळेपासूनच प्रेम...

Dairy: आमचं शाळेपासूनच प्रेम…

Subscribe

मी आणि रोहन बालपणापासूनच एका कॉलनीत वाढलो. पण कधीच मित्र म्हणून त्याच्याशी माझं बोलणं झालं नव्हतं. माझ्या बाकीच्या मैत्रीणी सुद्धा त्याच्याशी कधी बोललेल्या नाही. मी आठवीत असतानाची गोष्ट आहे. कॉलनीतून सहल निघाली होती. तेव्हा रोहन सुद्धा आला होता. गाडीत बसल्यानंतर सुरुवातीला मी माझ्याच मैत्रिणींमध्ये रमले होते.अचानक प्रवासादरम्यान रोहन आणि मी  कसे बोलायला लागलो हेच कळलं नाही. तेव्हा मी पहिल्यांदा असं एखाद्या मुलासोबत खुलेपणाने बोलत होती. मनात फार धडधड होत होती. नक्की काय होतयं हे कळतं नव्हतं. सहलीच्या ठिकाणी पोहचलो तेव्हा सुद्धा रोहन हा ऐवढ्या मित्रमैत्रणींच्या घोळक्यात मला वाकून वाकून पाहत होता. तेव्हा ही काही कळले नाही.

सहल आमची आनंदात गेली होती. घरी परतत होतो. पुन्हा गाडीचा प्रवास. तेव्हाच माझी आणि रोहनची अधिक गट्टी जमली. आम्ही दोघे रात्रभर एकमेकांशी बोलत राहिलो. बोलण्यात कधी सकाळ झाली हे कळलं नाही. खरंतर ही सहल माझ्यासाठी अविस्मरणीय म्हणण्यापेक्षा रोहनाला माझ्या आयुष्यात घेऊन येणारी होती. दिवसामागून दिवस जात होतो. कॉलनीत ही आमचं फारसं बोलणं व्हायच नाही. पण कधी रोहन समोर आला तर आमच्या नजरा एकमेकांवर काही सेकंद का होईना खिळून राहायच्या. तेव्हा प्रेम काय असतं हे काहीच माहिती नव्हतं. पण तो जेव्हा मला पहायचा तेव्हा खुप भारी वाटायचं. 10 वी त येई पर्यंत आमची मैत्री फार घट्ट झाली होती.

- Advertisement -

एकदा तर रोहनने कुठून तरी आईचा मोबाईल नंबर घेत त्याने डेरिंग करुन तिच्या फोनवर फोन केला. लॅन्डलाइवरुन आलेला फोन आईने  उचलला नाही. पुन्हा दोन-तीन दिवसांनी एका लॅन्डलाइनवरुन फोन आला. मात्र तेव्हा आईचा फोन मी उचलला. मी हॅलो म्हटले इतक्यात रोहनने दबक्या आवाजात कशी आहेस, भेटूयात का असे पटकन विचारले. तेव्हा आधी भीती वाटली. पण मी मैत्रीणीच्या नावाचा बहाणा करत त्याला भेटली. आमच्या भेटीदरम्यानच रोहनने समोरुन प्रपोज केले.  त्याला माझे उत्तर हो असे लगेच येईल अपक्षित नव्हते. मी होकार दिला होता आणि त्याला आधी यावर विश्वासच बसत नव्हता. असेच आमचे भेटणे होत राहिले.

कॉलनीत आम्ही एकमेकांकडे कधीच न बघणारे आता एकमेकांना भेटू लागलो होतो. हळूहळू हे सर्व कॉलनीत आणि नंतर घरी कळू लागलं. घरातल्यांनी तर आधी सुरुवातीला जे काही सुरु आहे ते बंद कर अशी तंबी दिली. पण छे, प्रेम कधी असं एका झटक्यात विसरता येतं का? काही गोष्टी अशा ही घडल्या ज्यामुळे आम्ही दोघे काही काळासाठी एकमेकांपासून दुरावले गेलो होतो. पण 12 वी त असताना पुन्हा आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हा घरातल्यांना आपण आपल्या रिलेशनशिप बद्दल सांगूयाच…असे ठरवले आणि एकदाचे सांगूनच टाकले. माझ्या घरातल्यांनी सुद्धा त्याला पहिल्यांदा भेटल्यानंतर एकच गोष्ट सांगितली, तुम्ही दोघं आयुष्यभर एकत्रित राहणार असाल तरच तुमच्या नात्याला प्रेमाचे नाव द्या. नाहीतर नाते तुमचे इथेचं थांबवा. आज ही माझ्या घरातल्यांनी सांगितलेली ही गोष्ट आणि एकमेकांवरचा दृढ विश्वास यामुळे आमचे नाते टिकून आहे. आमच्या नात्याला 14 वर्ष पूर्ण झालीत पण तिच आधीसारखं त्याला भेटण्याची उत्सुकता, आनंद हा नेहमीच मनात असतो.

- Advertisement -

हेही वाचा- Diary- पहीलं प्रेम, सुंदर आभास

- Advertisment -

Manini