Photo : केजरीवालांचे अजित दादांनी केले स्वागत, ठाकरेंनी ‘मातोश्री’बाहेर येऊन दिला निरोप

Arvind Kejriwal was welcomed by Ajit Pawaar, Uddhav Thackeray coming out of 'Matoshree'
बुधवारी (ता. 24 मे) अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सरकारने दिल्ली सरकारच्या विरोधात काढलेल्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. बुधवारी (ता. 24 मे) अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. तर आज (ता. 25 मे) अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वागत केले.