Thursday, June 1, 2023
घर मानिनी Diary Diary: उर्फीची फॅशन टेस्ट Bad, अभिनेत्याला म्हणाली...

Diary: उर्फीची फॅशन टेस्ट Bad, अभिनेत्याला म्हणाली…

Subscribe

उर्फी जावेद सध्या सोशल मीडिया सेंसेशन झाली आहे. तिच्या अतरंगी फॅशन आणि ड्रेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. काहींनी तिच्या फॅशनचे कौतुक केले तर काहींनी तिच्या कपड्यांवरुन ट्रोल केले. पण उर्फीला काहीही फरक पडत नाही.

आपल्या फॅशनमुळे इतरांवर छाप पाडणाऱ्या उर्फीचा प्रत्येक दिवशी लूक काहीतरी हटकेच असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने च्युईंगमने तयार केलेला टॉप घातला होता. तेव्हा ही तिला खुप जणांनी ट्रोल केले. पण उर्फीने तिच्या एका मुलाखतीत एका बड्या अभिनेत्याने तिच्या फॅशन टेस्टला बॅड म्हटल्याने तिने त्याला चांगलेच प्रतिउत्तर दिले.

- Advertisement -

खरंतर रणबीर कपूर एका शो मध्ये उर्फीच्या फॅशन सेन्सवरुन बोलला. तेव्हा तिच्या फॅशनवरुन त्याने असे उत्तर दिले होते की, मी उर्फीच्या फॅशनचा खुप मोठा फॅन नाही. पण माझे असे मानणे आहे की, आपण आज अशा जगात आहोत जेथे आपण आपल्या शरिरासह अगदी कंम्फर्टेबल आहोत. त्याचदरम्यान करिनाने त्याला मध्येच अडवत विचारले होते गुड टेस्ट या बॅड टेस्ट? त्यावर रणबीरने उर्फी बद्दल बॅड टेस्ट असे उत्तर दिले होते. यावरच उर्फीने त्याला चांगलेच प्रतिउत्तर दिले.

उर्फीने म्हटले की, मला वाईट वाटले की रणबीरने मला बॅड टेस्ट म्हटले. पण जेव्हा करिनाने कौतुक केले तेव्हा मी रणबीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. करिनाने कौतुक तर केलेय, तर आता रणबीरची काय लायकी? असे तिने म्हटले होते.

- Advertisement -

उर्फीने युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्यासोबत पॉडकास्टवर बोलताना तिने बालपणी काय त्रास सहन केला आणि वडिलांनी कशी वागणूक दिली या बद्दल ही ती बोलली होती. वडिल हे खुप रुढिवादी आणि जुन्या विचारांचे आहेत असे म्हणाली होती. तसेच बालपणी वडिल खुप मारायचे. जो पर्यंत ती बेशुद्ध पडायची नाही. आईने फार कमी वयात लग्न केले होते पण हे सर्व तिच्यासाठी सोप्पं नव्हतं. तिच्या बालपणीच्या जखमा अजून ही तिच्या मनात आहेत. पण तरीही आज न कोणत्या गोष्टीला घाबरता आपली अतरंगी फॅशन दाखवतेय हेच तिच्यासाठी खुप धाडसाचे काम आहे.


हेही वाचा- Diary: सोळा वर्षाच्या तब्बुचे अफेयर आणि फसवणूक

- Advertisment -

Manini