घरमनोरंजनही एक मायावी राक्षस... उर्फी नव्या लूकमुळे होतेय ट्रोल

ही एक मायावी राक्षस… उर्फी नव्या लूकमुळे होतेय ट्रोल

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान अशातच, उर्फीचा आणखी एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्फीचा नवा हटके लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

नेहमीप्रमाणे यावेळीही उर्फी जावेद पुन्हा एकदा अतरंगी लूकमध्ये दिसली. यावेळी तिने ब्लॅक पँट आणि त्याच रंगीचा शॉर्ट टॉप घातला आहे. इतकंच नव्हे तर उर्फीने तिच्या शॉर्ट टॉपवर गोल फिरणारी भिंगरी देखील लावली होती. उर्फीचा हा अतरंगी लूक पाहून अनेकजण कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “ही दुसऱ्या ग्रहावरुन आली आहे असं वाटतंय.” तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “मला वाटतं की, ही स्त्री नसून एक मायावी राक्षस आहे.”

- Advertisement -

‘बिग बॉस ओटीटी’ मुळे मिळाली प्रसिद्धी

उर्फीला बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. आत्तापर्यंत ती टेलिव्हिजनवरील अनेक रियालिटी शोमध्ये देखील दिसून आली आहे.

 


हेही वाचा : ‘कल्की 2898 एडी’ चे निर्माते ॲनिमेटेड प्रिल्युडचे करणार अनावरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -