Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary तीन मुलांची आई, 44 व्या वर्षी दुसर लग्न सिंगर कनिका कपूरचा प्रवास

तीन मुलांची आई, 44 व्या वर्षी दुसर लग्न सिंगर कनिका कपूरचा प्रवास

Subscribe

बॉलिवूड मधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर भले लंडनमध्ये राहत असली तरीही ती लखनौची राणी असल्याचे बोलले जाते. कनिकाचा जन्म २१ ऑगस्ट १९७८ मध्ये उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ मध्ये झाला होता. इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवण्यासाठी कनिका कपूर आज प्रसिद्ध गायिका आहे. तिची गाणी भारताव्यतिरिक्त दुसऱ्या देशात ही पसंद केली जातात.

कनिका कपूर आज भले ही यशस्वी गायिका असली तरीही तिने आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला आहे. कनिका कपूरने वयाच्या केवळ आठव्या वर्षातच पंडित गणेश प्रसाद मिश्रा यांच्याकडून संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. तेव्हा ती 12 वर्षाची होती तेव्हा ती ते काम करू लागली होती. त्याच दरम्यान कनिकाने ऑल इंडिया रेडिओच्या एका कार्यक्रमात परफॉर्मेन्स दिला होता. त्यानंतर तिने आपल्या करियरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही.

- Advertisement -

कनिकाने भजनं सुद्धा गायिली आहेत. तिने अनूप जलोटा यांच्यासोबत गाणी गायिली आहेत. या व्यतिरिक्त तिने बॉलिवूडला काही सुपर हिट गाणी सुद्धा दिली आहेत. तिचा पहिला म्युझिक व्हिडिओ 2012 दरम्यान रिलीज झाले होते. मात्र रागिनी एमएमएस मधील गाणे ‘बेबी डॉल मे सोने दी’ ने कनिकाला प्रसिद्धी मिळवून दिली. तिला सर्वश्रेष्ठ फिमेल प्लेबॅक सिंगरच्या कॅटेगरीत फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. या व्यतिरिक्त कनिका कपूरचे गाणे चिट्टियां कलाइयां सुद्धा गाणे प्रसिद्ध झाले होते.

कनिकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तिचे पहिले लग्न वयाच्या अठराव्या वर्षात झाले होते. मात्र ते लग्न काही वर्षांमध्ये मोडले. कनिकाला तीन मुलं आहेत. आयना, समारा आणि युवराज. घटस्फोटानंतर कनिकाने आपल्या मुलांना एकट्याने सांभाळले. वयाच्या 44 व्या वर्षी तिने दुसरे लग्न केले.


- Advertisement -

हेही वाचा- Diary: ‘मोहब्बते’ स्टार प्रीतिला ‘या’ कारणास्तव सोडावी लागली बॉलिवूड इंडस्ट्री

- Advertisment -

Manini