Eco friendly bappa Competition
घर क्राइम आधीच Wrong Side चालवत होती गाडी; महिलांनी अडवले तर थेट हाणामारीवरच उठली

आधीच Wrong Side चालवत होती गाडी; महिलांनी अडवले तर थेट हाणामारीवरच उठली

Subscribe

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 20 ऑगस्ट रोजी पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमधील सेक्टर 34 मध्ये वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर एक तरूणी विरुद्ध दिशेने तिची गाडी चालवत होती.

चंदीगड : वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्या एका तरूणीला काही महिलांनी टोकले तर उलट तीच तरुणीने त्या महिलांसोबत वाद घालत थेट हाणामारीच केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहचले आहे. ही घटना पंजाबची राजधानी चंदीगड येथील आहे.(The car was already driving on the wrong side If interrupted by women they rose directly to the fight)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 20 ऑगस्ट रोजी पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमधील सेक्टर 34 मध्ये वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर एक तरूणी विरुद्ध दिशेने तिची गाडी चालवत होती. या कृतीमुळे अपघातही होऊ शकतो म्हणून स्थानिक वाहन चालकांसोबतच प्रवासी वाहनांतील महिला त्या तरुणीला टोकत होत्या. मात्र, त्या तरूणींने कुणाचे काही एक न ऐकता गाडी चालवणे सुरूच ठेवले. दरम्यान यावेळी त्या तरुणींच्या गाडीने एका वाहनाला धडकही दिली.

- Advertisement -

हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी निलंबित; केजरीवालांची एक्शन

महिलांनी अडवताच भर रस्त्यावरच केली हाणामारी

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील चित्रफितीनुसार, चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या तरुणीने एका प्रवासी वाहनाला धडक दिल्यानंतर त्या वाहनांतील महिलांनी तिला अडवले. महिलांनी अडवले म्हणून त्या तरुणीचा राग अनावर झाला. तिने थेट त्या महिलांसोबत हुज्जत घातली. दोन महिला आणि त्या तरूणीच्या वादातचे रुपांतर काही वेळेनंतर हाणामारीत झाले. व्हायर झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रकरणे ती तरुणी त्या दोन महिलांनी चापटा-बुक्याने मारताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजुने त्या महिलांनीही त्या तरुणीला चांगलाच चोप दिल्याचे दिसत आहे. यावेळी या तीन महिलांनी एकमेकींचे केसही ओढले होते.

- Advertisement -

हेही वाचा : Drugs at the beach : कोट्यवधीचे ड्रग्स समुद्र किनाऱ्यावरून आले वाहून; तर्कवितर्कांना उधाण

प्रकरण पोलिसांत पोहचले आणि सामंजस्याने मिटले

भर रस्त्यावर वाद सुरू असल्याने प्रवासी वाहन चालकांने पोलिसांना फोन करत याप्रकरणाची माहिती दिली. काही वेळेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तीनही महिलांना पोलीस स्टेशनमध्ये नेले. यावेळी पोलिसांनी समजुतीची भूमिका घेत त्या तिन्ही महिलांना यापुढे असे न करण्याची ताकित देऊन प्रकरण समझोत्याने निपटून टाकले. मात्र, या घटनेमुळे सेक्टर 34 रस्त्यावर चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisment -