Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन गझलकार आणि गायक भूपिंदर सिंह यांचे निधन

गझलकार आणि गायक भूपिंदर सिंह यांचे निधन

Subscribe

गायक आणि गझलकार भूपिंदर सिंग यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पत्नी मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते, त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झाले होते.

या ट्विटमध्ये ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंग यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. याबाबत पत्नी मिताली सिंग यांनी सांगितल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

गायक भूपिंदर सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर येथे झाला. वडील नत्था सिंह यांच्याकडून त्यांना संगीताचे शिक्षण मिळाले. ते बॉलिवूडमधील  प्रसिद्ध गायक असून त्यांच्या नावावर अनेक गाणी आहेत. त्यांनी गायलेल्या गझलमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यादेखील प्रख्यात गायिका आहेत. भूपिंदर सिंह यांनी चुरा लिया है तुमने जो दिल को, दम मारो दम, महबूबा-महबूबा, दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन, एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में, नाम गुम जाएगा, अशी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली –

आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

मनाचा ठाव घेणाऱ्या आपल्या आवाजाने भूपिंदर सिंह यांनी अनेक गझल अजरामर केल्या. त्यांचा धीरगंभीर आणि भावस्पर्शी आवाज रसिकांच्या मनात कायम स्वरुपी रुंजी घालत राहील. ज्येष्ठ गायक, गझलकार भुपिंदर सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -