पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; शवविच्छेदनाच्या अहवालात मोठा खुलासा

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सिद्धू मूसेवाला यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, सिद्धधू यांच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या असून, शरीरात एक गोळी ही सापडली.

Punjabi singer Sidhu Musewala shot dead after Punjab government remove Security arrangements
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळी घालून हत्या, पंजाब सरकारने काढली होती सुरक्षा

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सिद्धू मूसेवाला यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, सिद्धधू यांच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या असून, शरीरात एक गोळी ही सापडली. तसेच, सिद्धू यांच्या खांद्यावर आणि मांड्यांवर जखमांच्या खुणा असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले. दरम्यान, आज सिद्धू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिद्धू मूसेवाला यांचा शवविच्छेदन (post mortem) अहवाल लवकरच सीलबंद लिफाफ्यामध्ये पोलिसांना (Police) पाठवणार असल्याचे मानसा सिव्हिल हॉस्पिटलचे (Manasa Civil Hospital) सिव्हिल सर्जन डॉ. रणजित राय यांनी सांगितले. दरम्यान, पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. त्यानंतर, सिद्धू मूसेवाला यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी तपासा घेतला असता, याप्रकरणी पाच संशयित आरोपींना अटक केली.

हेही वाचा – पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळी घालून हत्या, पंजाब सरकारने काढली होती सुरक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. यामध्ये सिद्धू यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत असल्याचे दिसते. मानसा येथील ढाब्यावरील हे सीसीटीव्ही फुटेज असून, यामद्ये दिसणाऱ्यांचीही चौकशी आणि तपास पोलीस करत असल्याचे समजते.

सलमान खानचे कनेक्शन?

या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि हल्लेखोर लॉरेन्स बिश्नोईचे कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असताना बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वास्तविक त्या काळात सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. यावेळी अभिनेता असीनसोबत ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. यावेळी गँगस्टर लॉरेन्सने त्याच्या साथीदारांसह अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याची संपूर्ण योजना आखली.

लॉरेन्स बिश्नोई योजना बनवताना ज्या शस्त्रास्त्रांबद्दल बोलला त्यांची व्यवस्था त्याला करता आली नाही. त्यामुळे गँगस्टरचा प्लॅन फसला आणि सलमान खानचा जीव वाचला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई सलमान खानवर नाराज होता. काळवीटाची शिकार केल्याबद्दल तो सलमान खानवर संतापला होता.


हेही वाचा – ह्रदयद्रावक! बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाचा सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न; चिमुकलीचा मृत्यू