Wednesday, May 8, 2024
घरमानिनीDiaryनवऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नीचा अश्लील डान्स, 'या' गावात आहे अनोखी प्रथा

नवऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नीचा अश्लील डान्स, ‘या’ गावात आहे अनोखी प्रथा

Subscribe

आयुष्यात एखाद्याला गमावल्याच्या दु:खातून पटकन सावरता येत नाही. घरातील मंडळींवर त्याच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो. मात्र चीनमध्ये मृत्यूनंतर एक वेगळी परंपरा पार पाडली जाते. परिवारातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरातील मंडळी अश्लील डांन्स करून घेतात. दु:खाच्या वेळी पार पाडली जाणारी ही परंपरा अतिशय हैराण करणारी आहेच. पण त्याचे कारण ऐकून ही तुम्हाला धक्का बसेल. (China weird tradition)

चीनच्या ग्रामीण परिसरात ही जुनी परंपरा कायम आहे. या परंपरेअंतर्गत चीनच्या काही ग्रामीण भागात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या अंत्यंसंस्कारावेळी अश्लील डान्स करण्यासाठी मुलींना बोलावले जाते. भले ही परंपरा विचित्र आहे मात्र ती आज ही गावात पार पाडली जाते. ऐवढेच नव्हे तर काळासह ही परंपरा मॉर्डन होत आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नी स्ट्रिप डांन्सरला बोलावून नाच गाणे करुन घेते.

- Advertisement -

अंत्यंसंस्कारावेळी स्ट्रिप डांन्सर्स अश्लील डान्स करतात आणि रडण्याचे नाटक करतात. अशातच असा प्रश्न उपस्थितीत होतो की, चीनच्या काही गावात ही डान्सची परंपरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.

असे मानले जाते की, चीन अंत्यंसंस्कारावेळी अधिकाधिक लोक एकत्रित यावेत म्हणून ही पद्धत वापरली जाते. परिवारातील सदस्यांनुसार डांन्सर बोलवण्याने अधिक लोक येतात आणि अंत्ययात्रेवेळी जेवढे अधिक लोक जमतात तेवढीच त्याच्या आत्म्याला शांति मिळते. दरम्यान, चीनच्या सरकारने विचित्र परंपरेवर बंदी घातली आहे. 2006 आणि 2015 मध्ये चीनच्या सरकारने या परंपरेच्या विरोधात कारवाई केली होती. मात्र तरीही ग्रामीण भागात ही परंपरा सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा- ‘या’ गावात पुरुषांना आहे no entry

- Advertisment -

Manini