Thursday, May 25, 2023
घर मानिनी Diary धक्कादायक! बहिणींची घोड्यावरून वरात काढल्यामुळे जात पंचायतीने केले बहिष्कृत

धक्कादायक! बहिणींची घोड्यावरून वरात काढल्यामुळे जात पंचायतीने केले बहिष्कृत

शंकरराम मेघवाल यांना आठ बहिणी असून त्यांच्या सहा बहिणींचे लग्न झाले आहे. तर  शंकरराम दोन छोट्या बहिणींचे लग्न होते. या लग्नात शंकरराम यांनी कोणतीही कसर ठेवली नाही.

नवरीला घोड्यावरून (Horse) आल्यामुळे संपूर्ण गावानी तिच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकला आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील ( Rajasthan) बाडमेर येथे मेल गावात घडली आहे. हे गाव जवळपास 4 हजार लोकवस्तीचे आहे. यात 300 कुटुंब हे दलित मेघवाल (Dalit Meghwal) समाजाचे आहे.

शंकरराम मेघवाल (Shankarram Meghwal) यांच्या दोन बहिणींचे नुकतेच लग्न पार पडले. या लग्नात शंकरराम मेघवाल यांनी त्यांच्या बहिणींना घोड्यावरून वरतीमध्ये (बिंदोली) आणले. यानंतर शंकरराम गावाने त्यांच्यावर बष्किकार टाकला आहे. गावाच्या जात पंचायतीने आदेश दिला की, शंकरराम मेघवाल यांनी बहिणींच्या लग्नात त्यांना घोड्यावरुन आणल्यामुळे त्यांचे हुक्का-पाणी बंद करायचे सांगितले. शंकरराम मेघवाल यांच्या घरच्यांशी संबंध ठेवू नका आणि बोलू नका, असे आदेश जात पंचायतीने गावाला दिले आहे.

- Advertisement -

शंकरराम मेघवाल यांना आठ बहिणी असून त्यांच्या सहा बहिणींचे लग्न झाले आहे. तर  शंकरराम दोन छोट्या बहिणींचे लग्न होते. या लग्नात शंकरराम यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. शंकरराम यांची 23 लक्षमी आणि 22 दीपू या दोघींच्या लग्न 7 फेब्रुवारीला झाले. या दोन्ही बहिणींच्या लग्नात मेघवाल यांनी संपूर्ण गाव सहभागी झाले होते. या दोन्ही बहिणींना लग्न मंडपात घोड्यावर बसून आणले.

- Advertisement -

 

दरम्यान, शंकरराम हे दलित मेघवाल समाजाचे आहेत. या समाजाच्या मुली लग्नात घोड्यावर बस नाहीत. परंतु, शंकरराम यांनी आपल्या दोन्ही बहिणींना लग्न मंडपात घोड्यावरून आणले. या कारणामुळे जात पंचायतीने शंकरराम यांचे हुक्का-पाणी बंद केले. शंकरराम यांनी बहिणींना घोड्यावर बसून स्त्री-पुरष समानताचा संदेश दिला.

शंकररामच्या दोन्ही बहिणी सासरी गेल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी यांच्या या कृतीबद्दल जात पंचायतीने 18 एप्रिलला तुगलकी फरमान काढला की, बहिणींना घोड्यावर बसविल्यामुळे त्यांना दंड ठोठावला. जर दंड भरला नाही तर त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लग्नाच्या वेळी नवरीला घोड्यावर बसविले तेव्हा गावातील सर्व जण होते. त्यावेळी कोणी काही बोलले नाही, असा सवाल शंकररामच्या बायको केला.

लक्ष्मी म्हणाली की, “माझे संपूर्ण कुटुंब ही लढाई लढणार आहोत. माझ्या भावाने मुलगा आणि मुलींमध्ये फरक केला नाही. त्यांनी आमच्या संगोपनात कोणतीही कमतरता केली नाही. आमच्या गावच्या पंचायतीने सांगितले की, मुली आजही चुल आणि मूल यासाठी त्यांचा जन्म झाल्याचे त्यांनी त्यांच्या आदेशातून दिसते.”

“जात पंचायतीने मला 18 एप्रिलला फोन करून बोलवून घेतले आणि सांगितले की, तुझ्या बहिणींना घोड्यावर बसविल्याबद्दल पंचायतीने तुझ्यावर 50 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. तू दंड भर नाही तर तुझ्यावर आम्ही बहिष्कार टाकू”, असे शंकरराम यांनी जात पंचायतीने सांगितले.

- Advertisment -

Manini