Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये कुरबूर

औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये कुरबूर

Subscribe

औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून या जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये कुरबूर सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गटामधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीला अद्यापही वर्षभराचा कालावधी बाकी असला तरी, अनेक नेत्यांनी स्वतःची मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता यामुळे भविष्यात विविध राजकीय पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पण आतापासूनच लोकसभा निवडणुकांमुळे उद्धव ठाकरे यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याचे चित्र दिसू लागले आहे. कारण औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून या जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये कुरबूर सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गटामधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. (Clash between two leaders Thackeray group over Aurangabad Lok Sabha seat)

औरंगाबादमध्ये ठाकरे गटाचे दोन मोठे नेते आहेत. यामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा समावेश आहे. पण या दोघांनाही औरंगाबाद लोकसभेवर दावा केला आहे. या दोघांमध्येही लोकसभेच्या या जागेवरून वाद सुरु झाला असून “व्हायरल झालेली यादी फेक आहे. काड्या मास्टर लोक यादी व्हायरल करतायत.” असा टोला नाव न घेता चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना लगावला आहे.

- Advertisement -

“मी एकनिष्ठ नेता, माझा पत्ता कट होऊ शकत नाही. मी इथे असल्यानंतर अंबादास दानवे यांना कशाला तिकीट मिळेल? असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी थेट 2024 च्या लोकसभा जागेचे तेच उमेदवार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता यामुळे उद्धव ठाकरे मात्र गोत्यात सापडणार असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागा वाटपांसदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. मविआमध्ये सध्या सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असल्याने राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. तर त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गट असल्याचे बोलले जात आहे. परंतु, मेरीटच्या आधारावर जागा वाटप करण्यात यावे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, आमचे 19 खासदार निवडून आले होते, तुम्हाला 19 खासदार पुन्हा लोकसभेत दिसतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे लोकसभेच्या 19 जागांवर ठाकरे गटाने दावा केल्याने राजकीय वर्तुळात जागा वाटपावरून विविध चर्चा रंगल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -