घरक्राइमCrime News : अटकेची भीती दाखवत महिलेकडून 11 लाखांची फसवणूक; आरोपीला राजस्थानातून...

Crime News : अटकेची भीती दाखवत महिलेकडून 11 लाखांची फसवणूक; आरोपीला राजस्थानातून अटक

Subscribe

Crime News अटकेची भीती दाखवून एका महिलेची तब्बल 11 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झाल्याचे समजताच पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला राजस्थानातून अटक केली.

मुंबई : अटकेची भीती दाखवून एका महिलेची तब्बल 11 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झाल्याचे समजताच पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला राजस्थानातून अटक केली. अनिल राजूमल जैन असे आरोपीचे नाव आहे. या घटनेचा सायबर सेल पोलिसाकडून तपास करण्यात आल्याचे समजते. (Crime News Fraud of 11 lakhs a woman showing fear of arrest Accused arrested from Rajasthan)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलेची 11 लाखंची फसवणूक झाली ती तक्रारदार महिला अंधेरी परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले होते. तिच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या गुनह्यांत तिच्यावर कुठल्या क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. भितीपोटी तिने विविध बँक खात्यात सुमारे अकरा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर करुनही संबंधित तोतया अधिकारी तिच्याकडे आणखीन मागणी करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने पोलिसांत तक्रार केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Pune Crime News : पुण्यात लाथाबुक्क्यांनी शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण

या तक्रारीनंतर पोलिसांनी तोययागिरी करुन फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसाकडून तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अनिल जैन याला राजस्थान येथून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

तपासात अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असल्याचे उघडकीस आले. या टोळीने सर्वोच्च न्यायालयाने बोगस कागदपत्रे पाठवून अनेकांना अटकेची धमकी देऊन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीच्या रक्कमेतून त्याने काही रक्कम एक गाळा खरेदीसाठी वापरली होती तर काही रक्कमेतून तो क्रिप्टो करन्सी खरेदी करणार होता. ही करन्सी तो त्याच्या सायबर ठग सहकार्‍यांना विदेशात पाठविणार होता.

या प्रकरणी अनिल राजूमल जैन या आरोपीस राजस्थानातून पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बँक पासबुक आणि काही दस्तावेज जप्त केले आहे. अटकेच्या भीती दाखविण्यासाठी अनिल जैनने सर्वोच्च न्यायालयाच्या बोगस पत्राचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.


हेही वाचा – Rameswaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफे ब्लास्टचा मास्टरमाइंड अब्दुल मतीन ताहाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -