घरदेश-विदेशLok Sabha 2024 : काँग्रेसच सांगतंय - आमच्या उमेदवाराला व्होट देऊ नका!...

Lok Sabha 2024 : काँग्रेसच सांगतंय – आमच्या उमेदवाराला व्होट देऊ नका! नेमकं काय आहे प्रकरण?

Subscribe

बांसवाडा डुंगरपूर लोकसभा मतदारसंघात अलीकडेच नाट्यमय घडामोडी घडल्या. भारत आदिवासी पक्षासमवेत युतीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने अर्जुन बामनिया यांना तिकीट दिले. मात्र बामनिया यांनी ऐनवेळी अरविंद डामोर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच रात्री काँग्रेसनेही युतीची घोषणा केली. त्यानंतर लगेचच डामोर नॉट-रीचेबल झाले आणि 8 एप्रिल रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

जयपूर : एकीकडे भाजपाने अब की बार चार सौ पारची घोषणा केली आहे तर दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडि आघाडीने रालोआला सत्तेवरून खाली खेचण्याचा पण केला आहे. त्यामुळे प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. पण राजस्थानमधील एका लोकसभा मतदारसंघात खुद्द काँग्रेसच आपल्या उमेदवाराला विजयी करू नका, असे सांगत आहे. त्यामुळे याचा फायदा भाजपाला होण्याची दाट शक्यता आहे.

बांसवाडा डुंगरपूर लोकसभा मतदारसंघात एका उमेदवारामुळे काँग्रेसची पूर्णपणे गोची झाली आहे. बहुधा इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादा पक्ष आपल्याच उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत असेल. काँग्रेसने येथे भारत आदिवासी पार्टीशी (बीएपी) युती केली आहे. मात्र काँग्रेस नेते अरविंद डामोर यांनीच आपल्या पक्षाचा गेम केला आहे. त्यामुळे पत्राने त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली असून ‘हात’ हे चिन्ह असलेल्या अरविंद डामोर यांना मतदान करू नका, असे काँग्रेस सर्वांना सांगत आहे.

- Advertisement -

बांसवाडा डुंगरपूर लोकसभा मतदारसंघात अलीकडेच नाट्यमय घडामोडी घडल्या. भारत आदिवासी पक्षासमवेत युतीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने अर्जुन बामनिया यांना तिकीट दिले. मात्र बामनिया यांनी ऐनवेळी अरविंद डामोर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच रात्री काँग्रेसनेही युतीची घोषणा केली. त्यानंतर लगेचच डामोर नॉट-रीचेबल झाले आणि 8 एप्रिल रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यासाठी काँग्रेसने त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली असली तरी, त्यांचे निवडणूक चिन्ह काँग्रेसचा पंजाच आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : रायबरेली आणि अमेठीतील काँग्रेस उमेदवार कोण? अँटनी यांनी दिले संकेत

या निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीसमवेत युती करून आम्ही राजकुमार रोत यांना पाठिंबा दिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पण उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अरविंद डामोर हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे आहे. शिवाय, अरविंद डामोर हे काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार त्यांच्या पारड्यात बऱ्यापैकी मते जाऊ शकतात. मात्र, या संभ्रमाचा फायदा भाजपाला होऊ शकतो.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महिलांना उमेदवारी देण्यात भाजप आघाडीवर; मात्र समान हक्क देण्यात महाराष्ट्र अजुनही पिछाडीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -