Saturday, April 27, 2024
घरमानिनीFashionलग्नासाठी ज्वेलरी खरेदी करताय, लक्षात घ्या 'या' गोष्टी

लग्नासाठी ज्वेलरी खरेदी करताय, लक्षात घ्या ‘या’ गोष्टी

Subscribe

लग्न ठरल्यावर सगळ्यात महत्वाची असते ती खरेदी. लहेंगा, साडी यांची खरेदी खूप वेळ घेऊन पारखून केली जाते. मात्र दागिन्यांची खरेदी कपड्यांशी सुसंगत नसते. मुलीसाठी सोन्याचे दागिने भरपूर घेतले जातात. पण सगळेच दागिने ती लग्नात घालेल असे नाही. अशावेळी बजेट संपते. आपल्या लग्नासाठी योग्य लग्नाचे दागिने निवडणे महत्वाचे आहे, कारण ते तुमचा संपूर्ण लुक वाढवू शकते आणि तुमच्या या खास दिवसाला अभिजातता आणि सुसंस्कृतपणाचा स्पर्श जोडू शकते. मग काय करायचे ते कळत नाही. तुम्हाला लग्नासाठी योग्य दागिने खरेदी करायचे असतील तर या टिप्स फॉलो करा.

आधी बजेट ठरवा

लग्नाच्या खरेदीसाठी जाण्यापूर्वी आधी घरातले सगळे एकत्र बसून बजेट ठरवा. असे केल्याने तुम्ही योग्य खर्च करू शकाल. मात्र जे बजेट ठरले आहे त्यातच खर्च करण्याचा प्रयत्न करा. त्याबाहेर जाऊ नका.

- Advertisement -

पहिल्यांदा दागिन्यांची खरेदी

जेव्हा तुम्ही लग्नाची खरेदी सुरू करता, तेव्हा सगळ्यात आधी नवर्या मुलीसाठी दागिन्यांची खरेदी करा. दागिने खरेदी केल्यावर लेहेंगा किंवा साडी खरेदी करा. असे केल्यास तुम्ही दागिने घेण्यासाठी जास्त बजेट खर्च झाले तरी घाबरणार नाही. उलट तुम्ही तुमच्या दागिन्यांच्या बरोबरीने ड्रेस कस्टमाईज करू शकाल.

दागिन्यांची शैली

तुमच्या लग्नाची एकूण शैली आणि थीम विचारात घ्या. तुम्ही पारंपारिक, विंटेज किंवा आधुनिक लुकसाठी प्राधान्य देत आहात का? तुमचे दागिने तुमच्या ड्रेसला आणि तुमच्या लग्नाच्या एकूण सौंदर्याला पूरक असले पाहिजेत. तुमची वैयक्तिक शैली प्रतिबिंबित करणारे दागिने निवडा आणि यामध्ये तुम्ही अधिक आत्मविश्वासी आणि सुंदर दिसाल.

- Advertisement -

मॅचिंग सेट वि. मिक्स आणि मॅच

तुम्हाला मॅचिंग ज्वेलरी सेट घालायचा आहे की युनिक आणि पर्सनलाइझ लुकसाठी वेगवेगळे दागिने घ्यायचे आहे अथवा मिक्स आणि मॅच करायचे आहेत हे ठरवा. धातू आणि शैलींचे मिश्रण आधुनिक आणि निवडक वातावरण तयार करू शकते, तर जुळणारे संच एकसंध आणि समन्वित स्वरूप देतात. तुमच्या आवडीनुसारच ते फायनल करा.

चेहऱ्याला सूट होणारे दागिने

बिंदी,नथ, कानातले आदी गोष्टी खरेदी करण्यापूर्वी आधी घालून बघा. ते तुमच्या चेहर्याला शोभत असेल तर त्याची खरेदी करा. चेहऱ्याला शोभत नसेल तर अजिबात घेऊ नका.


 

हेही वाचा : मांगटिकाचे ट्रेंडी डिझाइन्स

- Advertisment -

Manini