Wednesday, February 28, 2024
घरमानिनीFashionमांगटिकाचे ट्रेंडी डिझाइन्स

मांगटिकाचे ट्रेंडी डिझाइन्स

Subscribe

आजकाल बऱ्याच जणी सण आणि लग्नसमारंभात मांगटीका अवश्य घालतात. ड्रेसच्या स्टाईल आणि रंगानुसार मांगटिक्का निवडण्यात येतो. बाजारातून याचे विविध डिझाइन्स सहज मिळतात. मांगटिक्का हा कपाळावर लावण्यात येतो. सध्या बाजारात ट्रेंडिंगवर असलेल्या मांगटिक्काचे डिझाइन्स पाहुयात,

बोरला मांगटिक्का –
मांग टिक्यामध्ये अनेक डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जर तुमचे कपाळ लहान असेल तर ‘बोरला मांगटिक्का’ अवश्य ट्राय करा. यात स्टोन वर्क आणि मोत्यांचे डिझाईन असलेले बोरला मांगटिक्का तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. जर तुम्ही राजस्थानी लूक करणार असाल तर बोरला मांगटिक्का नक्की घाला. यात तुम्ही खूपच सुंदर दिसाल.

- Advertisement -

फ्लॉवर डिझाईन मांगटिक्का –
फुलांच्या डिझाईनचा मांगटिक्का हा लहान कपाळावर जास्त शोभून दिसतो. अगदी सिम्पल आणि लहान असल्याकारणाने तो वेअर करताना त्रास देखील होत नाही. साडी, सूट किंवा कोणत्याही एथनिक पोशाखावर फ्लॉवर डिझाईन मांगटिक्का खूपच छान दिसतो. ह्यात प्रामुख्याने डायमंड डिझाइन्स मिळतात.

- Advertisement -

गोल्डन टच मांगटिक्का –
गोल्डन टच असणारा मांगटिक्का हा वधूसाठी उत्तम पर्याय आहे. लाल रंगाच्या साडीवर हा मांगटिक्का खूपच शोभून दिसतो. ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये मिळतात. चैनसारख्या असणाऱ्या या मांगटिक्कामध्ये गुंघुरुवाली डिझाईन सुद्धा असते.

मोती असलेले मांगटिक्का –
‘गोल्डन टच आणि मोती’ असलेले मांगटिक्का हा लग्नसमारंभासाठी उत्तम पर्याय आहे. लेहेंग्यावर ही डिझाइन्स तुम्हाला एक रिच लूक देईल. हा मांगटिक्का तुम्ही हलक्या रंगाच्या साडीवरही घालू शकता.

चांद बाली मांगटिक्का –
मांगटिक्यामध्ये ‘चांद बाली मांगटिक्का’ ही डिझाईन सध्या ट्रेंडिंगवर आहे. गोल्डन टच आणि रंगबेरंगी खडे असलेले हे डिझाईन तुम्ही ट्रेडिशनल लूकवर घालू शकता.

मांगटिक्का घालताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या –

1.मांगटिक्का खरेदी करताना साखळीची अर्थात चैनची काळजी घ्या.
2. कपाळाच्या आकारानुसारच मांगटिक्का निवडा.
3.मांगटिक्का खरेदी करताना तो एकदा तरी अवश्य ट्राय करा.
4.मांगटिक्का घालताना तो धाग्याच्या सहाय्याने नीट पिनअप करा जेणेकरून तो समारंभात निघणार नाही.

 

 


हेही वाचा ; एथनिक लूकसाठी परफेक्ट झुमके

- Advertisment -

Manini