घरदेश-विदेशTania Singh Suicide : मॉडेल तानिया सिंहची आत्महत्या, चौकशीच्या फेऱ्यात अडकला IPL...

Tania Singh Suicide : मॉडेल तानिया सिंहची आत्महत्या, चौकशीच्या फेऱ्यात अडकला IPL चा खेळाडू

Subscribe

गुजरात : सूरत येथील लोकप्रिय मॉडेल तानिया सिंहने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तानियाने आपले आयुष्य संपवले आहे. काल (ता. 20 फेब्रुवारी) तानियाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. पण तिने असे का केले? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. तर धक्कादायक माहिती म्हणजे या प्रकरणी पोलिसांकडून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधील सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. तानियाने आत्महत्या करण्याच्या काही वेळाआधी अभिषेकसोबत तिचे शेवटचे बोलणे झाल्याची माहिती समोर आली आहे. (Model Tania Singh’s suicide, IPL player caught in the round of investigation)

हेही वाचा… Ameen Sayani : रेडिओ जगतातील जादुई आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तानिया सिंह ही गेल्या दोन वर्षांपासून फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग या क्षेत्रात शिक्षण घेत होती. पण अचानक मंगळवारी तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर पोलिसांकडून चौकशीदरम्यान तानियाचा फोन तपासण्यात आला. त्यावेळी पोलिसांना आयपीएल खेळाडू अभिषेक शर्मा याचा शेवटचा फोन आल्याचे दिसून आले. ज्यामुळे आता या प्रकरणी अभिषेकची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्सकडून देण्यात आली आहे. तानियाच्या फोनमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर प्रेमप्रकरणामुळेच तानियाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे.

28 वर्षीय तानिया सिंह ही सूरतमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि मॉडेल होती. तिचे इंस्टाग्राम या सोशल मीडियावर साधारणतः 10 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टा बायोमध्ये तिने डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला आहे. तर, अभिषेक शर्मा IPL मध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमचा खेळाडू आहे. ऑलराऊंडर अशी त्याची ओळख आहे. आयपीएलमध्ये त्याने कमाल खेळी खेळली आहे. आयपीएलच्या 47 सामन्यात त्याने 137.38 सरासरीनुसार 893 रन बनवले आहेत. 2022 मध्ये अभिषेकला आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने साडे सहा कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -