देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाची सून आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी त्यांच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. त्यांचे विविध साडीचे लुक नेहमीच चर्चेत असतात. कोणताही कार्यक्रम असो, नीता अंबानी त्यांचे सौंदर्य, स्टाईल आणि आकर्षक दिसण्यामुळे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. नीता अंबानी यांना भारतीय स्टाईलच्या साडीची विशेष आवड आहे. आज आम्ही तुम्हाला नीता अंबानीचे स्टायलिश साडीचे लुक दाखवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कमी बजेटमध्ये क्लासी लुक मिळेल.
महाराष्ट्रीयन पैठणी साडी
साडी क्वीन नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात पैठणी साडीत पूर्णपणे महाराष्ट्रीयन दिसत होत्या. ब्लू कलरच्या या साडीमध्ये नीता अंबानींचा मराठमोळा लूक दिसला. हा पारंपारिक लूक पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोज रिंगसोबत बांगड्याही घातल्या होत्या.
ऑफ व्हाईट साडी
ऑफ व्हाईट कलर खूप सोबर दिसतो. एका कार्यक्रमासाठी नीता अंबानींनी ही सुंदर साडी कॅरी केली होती. सोबत हिरव्या रंगाचा मोठा नेकलेस आणि मॅचिंग कानातले देशील परिधान केले होते. तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या बाजारात 2000 ते 4000 रुपयांना सहज मिळू शकतात.
कांचीपुरम साडी
अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये नीता अंबानी यांनी लाल कांचीपुरम साडी नेसली होती. या साडीवर गोल्डन बॉर्डर आणि जरदोजी एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
मलबारी सिल्क साडी
नीता अंबानी यावेळी जांभळ्या रंगाच्या बनारसी मास्टरपीस साडीत दिसल्या. साडीची सोनेरी बॉर्डर साडीचे सौंदर्य आणखीनच वाढवत होती. त्यांनी नेकलेससोबत मॅचिंग स्टड कानातले घातले होते. त्यांनी एका हातात बांगडी आणि अंगठीही पेअर केली होती.
ब्रोकेड साडी
मोठ्या किनारी असलेल्या साड्या आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्या खूप रंगीबेरंगी देखील दिसतात. या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही सिल्क फॅब्रिकचा ब्लाउज कॅरी करू शकता.
बनारसी सिल्क साडी
बनारसी साडी फॅशन कधीही जुनी होत नाही. लग्नाच्या कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही भरजरी बनारसी साडी स्टाइल करू शकता. नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या बनारसी साडीत त्यांचा रॉयल लूक दिसत होता.
________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde