Monday, February 19, 2024
घरमानिनीFashionहिवाळ्यात स्वेटरसोबत साडी करा 'अशी' स्टाईल

हिवाळ्यात स्वेटरसोबत साडी करा ‘अशी’ स्टाईल

Subscribe

हिवाळा सुरु झाला आहे. आणि या हिवाळ्यात कपडे कसे घालायचे हे आपल्याला कळत नाही. पण जर का तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर हिवाळ्यात स्वेटरसोबत कशी साडी नेसायची हे आपण जाऊन घेणार आहोत. तसेच हिवाळ्यात अनेक घरगुती किंवा बाहेरचे कार्यक्रम देखील असतात. तेव्हा आपण पार्टी वेअर साडी नसतो आणि त्यावर स्लीव्हज ब्लाऊज घालतो. तेव्हा थंडी लागू शकते. अशातच या थंडी पासून संरक्षण करण्यासाठी आणि अंगाला उबदार वाटण्यासाठी आणि थंडी न लागण्यासाठी साडी नेसताना स्वेटर घालू शकता. स्वेटर सोबत साडी कशी नेसायची हे आपण पाहणार आहोत.

Discover more than 77 cardigan with saree - noithatsi.vn1. साडीसोबत स्वेटर मॅच करा

- Advertisement -

साडी नेसण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्वेटरचा रंग मॅच करावा लागेल. तसेच जर का तुमच्याकडे साडीच्या रंगाच्या विरुद्ध रंग असेल तुम्ही त्या साडीवर काँट्रास स्वेटर घालू शकता. यासोबतच जर का तुम्हाला साडीसोबत कोणत्या रंगाचे स्वेटर घालायचे हे काळात नसेल तर यासाठी तुम्हाला हवं असल्यास काळ्या रंगासोबत हलक्या किंवा व्हायब्रंट रंगाची साडी नेसू शकता. अशातच तुम्हाला हवं असल्यास काळ्या रंगासोबत हलक्या किंवा व्हायब्रंट रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता.

2. शॉल सारख्या साडीवर असे घाला स्वेटर

- Advertisement -

जर का तुम्ही प्रिंटेड साडी नेसणार असाल तर त्यामध्ये शॉलच्या प्रिंटचे स्वेटर घालू शकता. यामुळे साडी आणि स्वेटर उठून दिसेल. तसेच शॉल सारख्या स्वेटरमुळे तुम्हाला थंडी सुद्धा जास्त लागणार नाहीत. जर का तुमच्या कडे शॉलच्या प्रिंटचा स्वेटर नसेल तर तुम्ही त्यावर छान रंगीबेरंगी शॉल देखील घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक भन्नाट वाटेल. आणि साडी देखील उठाव दिसेल.

3. स्वेटर मटेरिअलचे ब्लॉउज घालू शकता

थंडीच्या दिवसात साडी नेसताना बॅकलेस किंवा स्लिव्हलेस बॉऊज शिवू नका. कारण यामुळे थंडी जास्त लागते. अशावेळी फुल्ल हॅन्डेड ब्लाउज शिवावा. यामुळे ब्लाउजची एक वेगळी स्टाईल दिसेल. तसेच साडीच्या कपड्यानुसार ब्लाउजचा प्रकार निवडू शकता. तसेच पार्टी वेअर साडी नेसत असाल तर त्यावर थंडीच्या दिवसात वेलवेटचा ब्लाऊज देखील शोभून दिसेल.


हेही वाचा : गोल्डन झुमक्यांच्या ‘या’ डिझाईन्स नक्की ट्राय करा…

- Advertisment -

Manini