घरमनोरंजनअनंत-राधिकाच्या प्री-वेंडिग सोहळ्यात सलमान, शाहरुख, आमिरचा एकत्र डान्स

अनंत-राधिकाच्या प्री-वेंडिग सोहळ्यात सलमान, शाहरुख, आमिरचा एकत्र डान्स

Subscribe

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा सध्या जामनगरमध्ये जंगी प्री-वेडिंग सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये देश-विदेशातील अनेक कलाकार , दिग्गज मंडळी, व्यावसायिक उपस्थित आहेत. शनिवारी कार्यक्रमाचा दुसरा दिवस पार पडला. यावेळी स्टेजवर सलमान, शाहरुखने आणि आमिर खानने एकत्र डान्स केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सलमान, शाहरुख, आमिरचा डान्स चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

बॉलिवूड कलाकार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात एकत्र डान्स केला. या तिघांना एकत्र नाचताना पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. शिवाय त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर ते अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

- Advertisement -

एका युझरने लिहिलंय की, “या तिघांना एकत्र केवळ अंबानीच करु शकतात.”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “पैशांची पावर बघा.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “हा 30 सेकंदाचा खरा आनंद आहे.” तसेच अनेक लोक या स्टार्सच्या बाँडिंगवर आणि त्यांच्या डान्स स्टाइलवर देखील कमेंट करताना दिसत आहेत.

- Advertisement -

3 मार्च रोजी प्री-वेडिंगचा शेवटचा दिवस

या प्री-वेडिंग सोहळ्याची सुरूवात 1 मार्च रोजी कॉकटेल पार्टीने झाली होती. त्यानंतर 2 मार्च रोजी ‘अ वॉक ऑन द वाइल्ड साईड’ आणि ‘मेला’ हे कार्यक्रम पार पडले. तर 3 मार्च रोजी पाहुण्यांसाठी लंच आणि डिनरचे आयोजन केले जाईल, जिथे त्यांना 2500 हून अधिक पदार्थ दिले जातील.

कार्यक्रमात ‘हे’ कलाकार उपस्थित

बॉलिवूड कलाकार शाहरुख खान , अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर यांच्यासह काही हॉलिूवूड सेलिब्रिटी आणि व्यावसायिक देखील लग्नात सहभागी झाले आहेत. या यादीमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, ब्लॅक रॉक सीईओ लॅरी फिंक, फेसबुक मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, डिस्ने सीईओ बॉब इगर, हॉलिवूड गायिका रिहाना यांचा समावेश आहे.

 


हेही वाचा :

मनीषा रानी ठरली ‘झलक दिखला जा 11’ ची विजेती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -