Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthभिजवलेले चणे खाण्याचे जबरदस्त फायदे

भिजवलेले चणे खाण्याचे जबरदस्त फायदे

Subscribe

भारतामध्ये काळ्या चण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याकडे काळ्या चन्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. अनेक जण जीमवरुन किंवा सकाळी मॉर्निंग वॉक करुन आल्यानंतर भिजवलेल्या चण्याचे सेवन करतात. खरंतर सकाळी उपाशीपोटी भिजवलेल्या चण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे दररोज 1 वाटी भिजवलेल्या चण्याचे सेवन करावे.

दररोज 1 वाटी भिजवलेले चणे खाण्याचे फायदे

Kala Chana Recipe » Dassana's Veg Recipes

- Advertisement -
  • रक्तातील साखर राहते नियंत्रित

रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी भिजवलेले चणे खूप मदत करतात. चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स फायबरर्स यांसारखे पोषक तत्व भरपूर असतात. त्यामुळे चण्यांचे सेवन केल्याने आपल्याला आजार होण्याचा धोका कमी असतो.

  • पचनक्रिया सुधारते

दररोज भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. त्यासोबतच ज्या व्यक्तींना कफाची समस्या आहे, अशा लोकांनी चणे खाल्ले पाहिजे. चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते यामुळे पोट साफ होते.

- Advertisement -

Legume of the month: Chickpeas - Harvard Health

  • वजन कमी होते

चण्यामध्ये ग्यायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट करण्याच्या विचारात असाल तर चण्यांचा आहारात समावेश करा. तसेच युरीनचा त्रास होत नाही. भिजवलेले चणे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार युरीनला जाण्याची समस्या दूर होते. पाईल्सचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

  • रक्ताची कमतरता भरुन काढते

चण्यामध्ये हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. चणे फक्त रक्त वाढविण्यासाठीच नाहीतर शरीराच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरते.

  • डोळ्यांसाठी फायदेशीर

चणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. कारण चण्यामध्ये बी कॅरोटीन तत्व असतात. डोळ्यांच्या नसांना नुकसान पोहोचवण्यापासून वाचवत असतात. त्यामुळे नजर चांगली होते. इतकेच नाही तर गरोदर महिलांसाठी सुद्धा चण्यांचे सेवन ऊर्जा देण्यासाठी लाभदायक ठरतात.


हेही वाचा : Food Tips : मसाल्यात भेसळ तर नाही ना? असे ओळखा

- Advertisment -

Manini