Thursday, February 22, 2024
घरमानिनीFashionगोल्डन झुमक्यांच्या 'या' डिझाईन्स नक्की ट्राय करा...

गोल्डन झुमक्यांच्या ‘या’ डिझाईन्स नक्की ट्राय करा…

Subscribe

झुमके अनेक प्रकारचे असतात. तसेच सोनेरी झुमके हे साडीवर किंवा लग्न सभारंभात जास्त वापरले जातात. सोनेरी झुमक्याचे नवीन प्रकार सुद्धा आता ट्रेंडिंगमध्ये आहे. तसेच जर तुम्ही नवीन सोन्याचे झुमके घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही जरी सोन्याचे झुमके खरेदी करत नसाल तर त्या साखरे दुसरे झुमके तुम्ही खरेदी करू शकता. गोल्डन दागिने जशी तुमची साडी किंवा ड्रेस असेल त्यानुसार तुम्ही ते घालू शकता. तसेच फक्त सोनेरी आणि त्यामध्ये असलेले डिझाइन्स देखील तुम्हाला हव्या त्या डिझाइन्समध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात. तसेच सोन्याच्या झुमकीच्या नवीन डिझाईन्स कोणकोणत्या आहेत ते पाहूया….

1. गोल्ड प्लेटेड झुमके

- Advertisement -

या कानातल्यांची फॅशन खरंतर बाहुबली चित्रपटापासून आली. देवसेना या बाहुबली चित्रपटातील नायिकेने हे कानातले घातल्याचे दिसलं तेव्हापासून हे डिझाईन ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये आता बरेच प्रकार आले आहेत. हे कानातले घातल्यावर फारच सुंदर दिसतात.

2. गोल्ड टोन पीकॉक मोती झुमका

मोरांचं डिझाईन असलेले हे झुमके फारच ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये तुम्हाला मल्टीकलर मोर झुमकीही बाजारात मिळतील. जर तुम्हाला हँगिंग कानातले आवडत असतील तर असं डिझाईन तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये असलंच पाहिजे. कोणत्याही साडीवर हे कानातले छानच दिसतात.

- Advertisement -

3. टेम्पल डिझाईन झुमका

टेम्पल डिझाईनचा झुमका हा प्रत्येक सणाला ट्रेंडिंगमध्ये असतो. नेहमीच्या झुमक्याच्या डिझाईनपेक्षा हे झुमके वेगळे आहेत. तसेच जेव्हा लग्नात पेशवाई लूक तुम्ही करता तेव्हा तुम्ही टेम्पल डिझाईनचा झुमका घालू शकता. या झुमक्यामध्ये बारीक डिझाइन्स आणि हेव्ही डिजाइन्स देखील तुम्हाला मिळतील.

4. गोल्ड कंटेपररी झुमके

जर तुम्ही मॉर्डन झुमक्याच्या डिझाईनच्या शोधात असाल तर कंटेपररी झुमक्याची स्टाईल एकदा ट्राय करून बघा. हे झुमके गोल्ड प्लेटेड असून त्यावर आर्टिफिशियल स्टोन्सच्या डिझाइन्स त्यावर असतात. तसेच हे कानातले तुमच्या ट्रेडीशनल कुर्ती किंवाकोणत्याही ट्रेंडी साडीवर अगदी उठून दिसतील.

5. गोल्ड प्लेटेड कुंदन झुमके

लग्नसराईत कुंदन दागिन्यांना पर्याय नाही. झुमक्यांमधील हे अजून एक सुंदर डिझाईन आहे. ज्यामध्ये एक नाहीतर पाच छोटेछोटे झुमके आहेत. गोल्ड प्लेटेड कुंदन झुमके हे दिसायला तर रिच आहेतच पण त्याची किंमतही अगदी बजेट फ्रेंडली आहे. तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर जरी हे कानातले महाग वाटले तरी तुमच्या बजेटमध्ये हे नक्कीच बसतील. अशातच तुम्हालाही गोल्ड प्लेटेड कुंदन झुमके आवडत असल्यास हे कानातले नक्की ट्राय करा.


हेही वाचा :

- Advertisment -

Manini