Thursday, April 18, 2024
घरमानिनीFashionपायांचे सौंदर्य वाढवतील 'ही' डिझायनर जोडवी

पायांचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ डिझायनर जोडवी

Subscribe

महिलांना सर्वात जास्त दागिने घालण्यास आवडतात. महिला काही खास कार्यक्रम आणि फॅशन ट्रेंडनुसार दागिने खरेदी करणे पसंद करतात. यात नेकलेस, पैंजण, अंगठी, इयररिंग्स आणि जोडवी याचे नवनवीन डिझायन खरेदी करत असतात. जोडवी ही विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. बाजारात अनेक जोडवीचे डिझायन तुम्हाला पाहायला मिळतात.

विवाहित महिला या नेहमी चांदची जोडवी पायात घालतात. जोडवीमध्ये वेगवेगळे डिझायन देखील बाजार उपलब्ध आहेत. यात ऑक्सिडाइज्ड जोडवीच्या डिझायन देखील तुम्ही ट्राय करू शकता. यात तुम्हाला वेगवेगळे डिझायन मिळतील आणि या जोडव्यांनी तुमच्या पायातील बोटे सुंदर दिसतात.

- Advertisement -

घुंघरूची जोडवी

जर तुम्हाला पारंपारिक दागिने घालण्यास आवडत असेल, तर तुम्हाला घुंघरुची जोडवी तुम्हाला नक्की आवडेल. घुंघरूची जोडवी तुमच्या पायाच्या तीन बोटात घालतात. तेव्हाच ही घुंघरूची जोडवी तुमच्या पायाच्या बोटांना चांगली दिसते. ही जोडवी तुमच्या पायाच्या पोटानुसार मोठी आणि छोटी करता येते.

- Advertisement -

वेव जोडवी

प्रत्येक जण आपआपल्या आवडीनुसार जोडवी निवडतात. जर तुम्हाला सिंपल दागिने आवडत असेल, तर तुम्हाला वेव जोडवीची डिझायन तुम्हाला नक्की आवडले. वेव जोडवी दिसायला सिंपल असते आणि तुम्ही ही जोडवी दररोज घालण्यासाठी चांगला पर्याय आहे. ही जोडवी तुमच्या पायाच्या बोटानुसार बाजारा मिळते. ही जोडवी तुम्हाला ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.

मोराच्या आकाराची जोडवी

मोराचे डिझायनचे नेकलेस, झुमके, अंगठी घालायला महिलांना आवडते, तर मग तुम्हाला मोराचे डिझायन असलेली जोडवी नक्की आवडेल. या जोडव्यांच्या डिझायनमध्ये तुम्हाला रंगाचे देखील पर्याय उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही सिंपल मोराची डिझायन असलेली ऑक्सिडाइज्ड जोडवी देखील पायाच्या बोटात घालू शकता. मोराच्या डिझायच्या जोडवी तुम्हाला बाजारात उपलब्ध आहेत. जोडवी घातल्याने तुमच्या पायाची बोटे ही खूप सुंदर दिसतात. यासाठी तुम्हाला जोडवीच्या डिझायन ट्राय करून बघा.


हेही वाचा – महिलांनी बांगड्या का घालाव्यात

- Advertisment -

Manini