घरमहाराष्ट्रCordelia Cruz Drugs Case : शाहरुख खानच्या अडचणी वाढणार? वानखेडेंनी हायकोर्टात केली...

Cordelia Cruz Drugs Case : शाहरुख खानच्या अडचणी वाढणार? वानखेडेंनी हायकोर्टात केली ‘ही’ मागणी

Subscribe

Cordelia Cruz Drugs Case : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला  (Aryan Khan) सोडण्यासाठी तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी स्वत:च्या बचाव करताना म्हटले की, या प्रकरणात लाच देणाऱ्या पक्षावरही म्हणजेच शाहरुख खानविरोधातही कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Cordelia Cruz Drugs Case Shah Rukh Khans problems will increase?Wankhede made this demand in the High Court)

हेही वाचा – Ganeshotsav 2023 : POPच्या गणेशमूर्तींना परवानगी, पण…, ‘हे’ आहे बंधन

- Advertisement -

ऑक्टोबर 2021 मध्ये बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत अनेकांना अंमली पदार्थ प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्जवर सुरू असलेल्या पार्टीवर एनसीबी मुंबईचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापेमारी करताना करावाई केली होती. त्यानंतर 3 आठवड्यांनी आर्यन खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दरम्यान, आर्यन खानला सोडण्यासाठी तत्कालीन समीर वानखेडे यांनी 25 कोटींची लाच मागितली अशी तक्रार एनसीबीने केली होती. त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या घरावरही छापा टाकला होता. तसेच समीर वानखेडेंना सीबीआयने समन्स बजावले होते. याविरोधात समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्लीत सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा. या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करु नये. सीबीआय तपासाला स्थगिती द्यावी. मला अटक न करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी समीर वानखेडेने याचिकेत केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दोन्ही भावांमध्ये मध्यस्थीची गरज नाही; मनसेशी युतीबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले

सध्या या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायालयामध्ये सुरु आहे. बुधवारी (6 जुलै) झालेल्या सुनावणीदरम्यान समीर वानखेडे यांनी अर्जामध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली. वानखेडेंनी अर्जात केलेल्या बदलामुळे शाहरुख खानच्या अडचणीत  वाढण्याची शक्यता आहे. कारण समीर वानखेडे यांनी स्वत:चा बचाव करताना म्हटले की, ‘सरकारी सेवक म्हणून मी लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लाच देणाराही आरोपीच ठरतो. म्हणून शाहरुथ खानवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -