Monday, December 4, 2023
घरमानिनीFashionसेलिब्रेटींच्या 'या' दागिन्यांना आहे सर्वांधिक मागणी

सेलिब्रेटींच्या ‘या’ दागिन्यांना आहे सर्वांधिक मागणी

Subscribe

प्राचीन काळापासून दागिन्यांना खूप मागणी आहे. तसेच दागिन्यांमुळे आपण जे आउटफिट घालतो त्याचे सौंदर्य देखील वाढते. आजकाल व्हरायटी असलेल्या दागिन्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे. तसेच हल्ली सोन्यापासून मोत्यापर्यंतचे अनेक दागिने घातले जातात. यासोबतच दागिन्यांच्या डिझाइनमध्ये विविध प्रकारचे बदल हे दिवसेंदिवस होत असतात. अशातच आता सेलिब्रेटींच्या दागिन्यांचा ट्रेंडही पुन्हा नव्याने मार्केटमध्ये येतोय.

सेलिब्रिटींच्या पोशाखांपासून ते दागिन्यांपर्यंत दोन्ही गोष्टी अगदी अनोख्या आहेत. दीपिका पासून प्रियंकापर्यंतच्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना दागिने घालण्याची प्रचंड आवड आहे. या वर्षी सेलिब्रिटींच्या काही ज्वेलरी डिझाइन्सला खूप पसंती मिळाली आहे. तसेच आता नेमक्या कोणत्या दागिन्यांना पसंती मिळाली आहे. आणि कोणते दागिने सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत हे जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

Take Inspiration From Your Favourite B-Town Celebs For Your Jewellery Hunt  | WeddingBazaar

1. कियारा अडवाणीचा लग्नातला सेट

Sidharth Malhotra, Kiara Advani's wedding unseen pics: SEE PHOTOS

- Advertisement -

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कियाराचा वेडिंग लूक अप्रतिम होता. कियाराने झांबियन एमराल्डने बनवलेल्या नेकलेस सोबत ब्लू पिंक लेहेंगा घातला होता. हा नेकपीस नाशपातीच्या आकारासारखा होता. आणि तो हिऱ्यांनी जडलेला होता. नेकपीससोबत स्टड कानातले, मांगटीका आणि हातफूल होते. हा नेकपीस खूपच सुंदर दिसत होता.

2. दीपिका पदुकोण डायमंड नेकलेस

Deepika Padukone Debuts NEW Neck Tattoo at Oscars 2023 and It Will Drop  Your Jaws; See Pic - News18

ऑस्कर सोहळ्यात दीपिका पदुकोणला प्रेजेंटर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या फंक्शनसाठी दीपिकाने लुई व्हिटॉनचा मखमली ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. दीपिकाने यासोबत अतिशय सुंदर नेकलेस घातला होता. या नेकलेसच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचा नाशपातीच्या आकाराचा हिरा होता. दीपिकाने नेकलेससोबत मॅचिंग रिंग आणि ब्रेसलेट घातले होते. तसेच हा ज्वेलरी सेट यंदा ट्रेंडिंगमध्ये आहे.

3.सोनम कपूरचे मोत्यांचे दागिने

Sonam Kapoor's chic retro look steals the spotlight at Jio MAMI opening  night – FBC News

सोनम कपूरला फॅशन दिवा म्हणून ओळखले जाते. सोनमला भारतीय ते पाश्चिमात्य प्रत्येक लुक कसा रॉक करायचा हे माहित आहे. तिच्या आउटफिट्स सोबतच सोनमचे ज्वेलरी कलेक्शनही खूप सुंदर आणि अनोखे असतात. अशातच तिच्या या ज्वेलरीमुळे पर्ल ज्वेलरी पुन्हा ट्रेंडमध्ये येत आहे. विशेषत: मोत्यापासून बनवलेल्या दागिन्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे.

4.मलायका अरोरा

Malaika Arora For Khanna Jewellers On Behance | vlr.eng.br

 

मलायका अरोराचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. पोशाख असो किंवा दागिने असो, मलायका अरोराला नेहमीच नवीन फॅशन करायला आवडते. मलायका अरोराने परिधान केलेला हा ज्वेलरी सेट अतिशय दर्जेदार आहे. हा ज्वेलरी सेट पोल्की, डायमंड, रुबी आणि एमराल्डपासून बनवला आहे.

5.प्रियांका चोप्राचा हिऱ्याचा हार

Met gala 2023: Priyanka Chopra's stunning Bulgari diamond necklace is set  to be auctioned at a whopping 205 crores after the Met Gala | Vogue India

डायमंड नेकलेस ज्वेलरी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आली आहे. मेट गाला 2023 मध्ये प्रियांका चोप्राने ब्लॅक ऑफ शोल्डर गाउन परिधान केला होता. प्रियांकाने या आउटफिटसोबत डायमंड नेकलेस देखील घातला होता. प्रियांकाच्या या डायमंड नेकलेसला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आता हा डायमंड नेकलेस खूप ट्रेंडिंगमध्ये आहे.

_______________________________________________________________________

हेही वाचा :

 

- Advertisment -

Manini