Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionयुनिक दिसायचंय? ट्राय करा या अनारकली कुर्ती

युनिक दिसायचंय? ट्राय करा या अनारकली कुर्ती

Subscribe

एखादी फॅशन येते आणि काही वर्षांनी ती जाते. पण, अनारकली याबाबतीत अपवाद आहे. आजही अनारकली कुर्ती ट्रेंडिंगमध्ये आहेत. पार्टी असो वा लग्न समारंभ, अनारकली कुर्ती हा सर्व कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी उत्तम पर्याय आहे. याशिवाय या आऊटफिटमध्ये तुम्ही अगदी कम्फर्टेबल असता. या अनारकली ड्रेसमध्ये विविध प्रकारचे डिझाइन्स आता मार्केट मध्ये सहज उपलब्ध मिळतात. जसे की, अगदी पायघोळ घालणारे कुर्तीपासून ते शॉर्ट कुर्ती. अनारकली कुर्तीची फॅशन उन्हाळ्यातही करता येते कारण ते जास्त फिटिंगला बसणारे नसतात त्यामुळे तुम्ही ते सहज वेअर करू शकता.

साधी कॉटन कुर्ती – यात तुम्हाला विविध रंग मिळतात याशिवाय हा पॅटर्न दिसायला खूप सिम्पल असतो. जर तुम्ही ऑफिससाठी अनारकली कुर्तीच्या शोधात असाल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. विशेष करून या पॅटर्न मध्ये प्लेन रंग पाहायला मिळतात. या कुर्तीवर तुम्ही साधा मेकअप करून मोकळे केस ठेऊ शकता. त्यावर साजेशी शोल्डर बॅग घेतलीत तर तुमचा ऑफिससाठीचा लूक नक्कीच तयार होईल. ही कुर्ती तुम्ही दुपट्ट्याशिवाय घालू शकता यांसह लेगिंग आणि टाइट जीन्स तुम्हाला घालता येते. या कुर्ती बाजारात आणि ऑनलाईन दोन्हीकडे 500 रुपयांच्या आसपास मिळतात.

- Advertisement -

कॉटन प्रिटेंड कुर्ती – जर तुम्हाला हलक्या रंगाचे कपडे घालायला आवडत असतील तर तुम्ही कॉटन प्रिटेंड कुर्ती ट्राय करायला हवी. तुम्हाला यात अनेक हलक्या रंगाच्या छटा बाजारात उपलब्ध मिळतात. कॉटन प्रिटेंड कुर्ती जीन्ससोबत अधिक खुलून दिसतात. या कुर्तीस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी उपलब्ध असतात. ज्या तुम्हाला 400 ते 700 रुपयांच्या रेंजमध्ये मिळतील.

- Advertisement -

डिझायनर लेयर असणारी कुर्ती – ही कुर्ती आजकाल ट्रेंडमध्ये आहे. पार्टी आणि एखाद्या संभारंभासाठी सर्वोत्तम पर्याय डिझायनर लेयर असणारी कुर्ती नक्कीच असू शकते. या कुर्तीला लेयर असल्याने ती अधिक आकर्षक दिसते. या कुर्तीसोबत तुम्ही हेवी कानातले आणि हिल्स देखील घालू शकता. एखाद्या पार्टीसाठी बेस्ट लूक देणारी ही कुर्ती तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. तुम्हाला ही कुर्ती बाजारात साधारण 1500 ते 2000 रुपयांच्या आसपास मिळेल शिवाय ऑनलाईन ही मिळेल.

पायघोळ असणारी कुर्ती – तुम्ही लग्नासाठी जर अनारकली कुर्तीच्या शोधात असाल तर पायघोळ असणारी अनारकली कुर्ती नक्कीच ट्राय करा. ग्रेसफुल लूक मिळविण्यासाठी पायघोळ असणारी कुर्ती तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यात तुम्हाला सिम्पल आणि हेवी लूक असणारी अशी दोन्ही प्रकारची कुर्ती मिळतील.

 

 

 


हेही वाचा : Fasion Tips : सौंदर्यात भर पाडणाऱ्या अँकेलेटच्या युनिक डिझाइन्स

- Advertisment -

Manini