Saturday, February 24, 2024
घरमानिनीFashionगोऱ्या आणि सावळ्या रंगावरही हे कलर्स दिसतात खुलून

गोऱ्या आणि सावळ्या रंगावरही हे कलर्स दिसतात खुलून

Subscribe

कपड्यांची खरेदी करताना त्याचे फिटिंग्स आणि डिझाइनसोबत आपण त्याच्या रंगाचाही विचार करतो. कपडे निवडताना आपल्याला चांगलं दिसणारा आणि आपले सौंदर्य वाढविणारा रंग आपण निवडतो. पण, तरीही कपड्यांच्या रंगावरून अनेक जणींचा गोंधळ उडतो. आज आपण गोऱ्या आणि सावळ्या रंगाच्या स्किन टोनसाठी कोणत्या रंगाचे कपडे अधिक खुलून दिसतील हे पाहणार आहोत.

- Advertisement -

मरसाला रंग – भारतीय स्किन टोनसाठी मरसाला रंग अतिशय योग्य मानण्यात येतो. २०१५ मध्ये या रंगाला ‘कलर ऑफ दि इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत. तेव्हा पासून या रंगाला अधिक मागणी आहे. जर तुमचा वर्ण गोरा आणि सावळा असेल तर मरसाला रंगाचे कपडे तुम्हाला खुलून दिसतील.

एमरल्ड ग्रीन – हिरव्या रंगातील एमरल्ड ग्रीन ही छटा सावळ्या आणि गोऱ्या रंगावर अधिक छान दिसते. या रंगाने तुम्ही तुमचे आकर्षण वाढवू शकाल. एमरल्ड ग्रीन या रंगला हिरव्या रंगाची गडद छटा या नावानेही ओळखले जाते.

- Advertisement -

रॉयल ब्लु – गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये ‘रॉयल ब्लु’ रंगाला प्रचंड मागणी आहे. या रंगाचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास रॉयल ब्लु परिधान केल्यावर तुमचा रंग अतिशय सुंदरपणे उठून दिसतो. गोऱ्या आणि सावळ्या रंगासाठी हा रंग उत्तम पर्याय आहे.

मस्टर्ड येलो – अनेक जणी पिवळ्या रंगाचे कपडे घालायला टाळाटाळ करतात. इतकंच काय तर गडद वर्ण असलेल्या मुलींना असं वाटतं की या रंगात त्यांचा स्किन टोन अधिक गडद दिसतो. म्हणून त्या पिवळ्या रंगाच्या आऊटफिट्सकडे दुर्लक्ष करतात. पण, पिवळ्या रंगातील मस्टर्ड येलो ही छटा प्रत्येक स्किन टोनला फिट बसते.

कोरल रेड – पिवळ्या रंगाप्रमाणेच लाल रंगाचे कपडे घालणेही मुली टाळतात. अशावेळी तुम्हाला ‘कोरल रेड’ ही छटा उपयोगी पडेल. लाल रंगासह केशरी कॉम्बिनेशनपासून बनवलेली कोरल रेड तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. हा रंग क्लासी लूक देण्यासाठी तसेच स्टायलिश दिसण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

 

 


हेही वाचा ; साडीत स्लिम दिसायचंय? मग ‘या’ चुका टाळा

- Advertisment -

Manini