Friday, May 17, 2024
घरमानिनीFashionFasion Tips : सौंदर्यात भर पाडणाऱ्या अँकेलेटच्या युनिक डिझाइन्स

Fasion Tips : सौंदर्यात भर पाडणाऱ्या अँकेलेटच्या युनिक डिझाइन्स

Subscribe

स्त्री आणि दागिने यांचे नाते काही वेगळेच आहे. अनेक प्रकारचे दागिने हे स्त्रिया घालतात. दिवसेंदिवस दागिण्याचें अनेक प्रकार हे मार्केटमध्ये येऊ लागलेत. कॉलेज गर्ल्स साठी तर अनेक फॅन्सी दागिने उपलब्ध आहेत. ज्या त्या वेस्टर्न वेअर सुद्धा घालू शकता.

Jewellery Designing- 3 Types of Anklets You Can Craft

- Advertisement -

दररोज आपण सुंदर दिसावं यासाठी स्त्रिया या मेकअप सोबत अनेक प्रकारच्या ज्वेलरी घालतात. पण अनेक वेळा काहीतरी कमी वाटतच. अशा वेळी अँकलेट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. ज्याने तुमचे पाय हे पूर्वी पेक्षा सुंदर दिसतील. अनेक कलरफुल डिझाइन्स या अँकलेट मध्ये उपलब्ध आहेत. अँकलेट म्हणजे एक प्रकारचे पैंजणच. पण हे तुम्ही एका पायात सुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला हे जर एथिनिक लूक वर घालायचे असतील तर ते तुम्ही दोन्ही पायात घालू शकता. पाहुयात, याचे काही प्रकार

ब्रेसलेट अथवा कडा डिझाईन अँकलेट
आजकाल बऱ्याच जणी या ब्रेसलेट अथवा कडा डिझाईन अँकलेट घालताना दिसतात. हे डिझाईन सध्या ट्रँडिंगवर आहे. यामध्ये तुम्हाला जाड आणि पातळ अश्या दोन्ही डिझाइन्स मिळतील. हे डिझाइन्स तुम्ही पायात घातल्यास तुमच्या पायांचे सौंदर्य वाढेल. ही डिझाईन थोडी वजनदार असते. हे अँकलेट्स तुम्हाला ओकसाइड स्वरूपात सुद्धा मिळतील.

- Advertisement -

बटरफ्लाय डिझाईन अँकलेट
जर तुम्हाला बटरफ्लाय डिझाईनचे दागिने आवडत असतील तर तुम्हाला ह्या अँकलेट मध्ये हे डिझाईन सुद्धा मिळेल. रेगुलर कपड्यांसाठी हा ऑप्शन बेस्ट आहे. शॉर्ट जीन्स किंवा एखाद्या पंजाबी ड्रेसवर हे अँकलेट तुमच्या पायांचे सौंदर्य वाढवेल.

स्टार डिझाईन असलेले अँकलेट
जर तुम्हाला पायात काही वेगळ्या अथवा हटके स्टाईलचे अँकलेट घालायचे असतील तर स्टार असलेले अँकलेट हा उत्तम पर्याय आहे. ही खूप सुंदर डिझाइन असून कोणत्याही आऊटफिट वर सूट करणारी आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्हाला सिंगल किंवा डबल लेयरमध्ये सुद्धा मिळेल.

घुंघुरवाले अँकलेट
तुम्हाला एखाद्या समारंभात जसे की, हळद किंवा लग्न समारंभात जायचे असेल तर घुंघरूवाले अँकलेट बेस्ट आहेत. याने तुम्हाला एक ट्रेडिशनल लूक मिळण्यास मदत होईल. शिवाय तुमच्या आऊटफिटवर ते सूट सुद्धा होतील.

 


हेही वाचा ; डेनिम जॅकेट घालायच्या काही भन्नाट आयडिया

- Advertisment -

Manini