Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionउन्हाळ्यात दिसायचयं कूल मग वापरा 'हे' आऊटफिट

उन्हाळ्यात दिसायचयं कूल मग वापरा ‘हे’ आऊटफिट

Subscribe

असह्य होणारी उष्णता आणि सतत येणाऱ्या घामामुळे उन्हाळ्यात अंगावरील कपड्यांकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अशात कायम प्रश्न पडतो की, कोणते कपडे घालावेत. नेमकं काय टाळावे आणि काय घालावे हेच कळत नाही. कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा जेणे करून उन्हाच्या झळा लागणार नाहीत. आणि हे सगळं करताना आपण स्टायलिश कसे राहू हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या टीप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यातही स्टायलिश राहून एन्जॉय करू शकता.

हलक्या रंगाचे कपडे वापरा

उन्हाळ्यात कपडे निवडताना रंगाची देखील काळजी घ्या. गर्मीत हलक्या रंगाचे कपडे घाला. जास्त करून सफेद रंगाचे कपडे घाला. या दिवसांत काळ्या रंगाचा वापर अजिबात करू नका. याचाच अर्थ असा की पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या कपड्यांवर सूर्याचा प्रकाश जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे यात फारसे गरम होत नाही. यामुळे उन्हाळ्यात लोक पांढर्‍या कपड्यांना जास्त प्राधान्य देतात.

- Advertisement -

क्रॉप टॉप

मुलींची क्रॉप टॉपची फॅशन यंदाही ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही हाय वेस्ट जीन्स, शॉर्ट्स, स्कर्ट, पॅंटसह ते पेअर करु शकता. ते प्रत्येक प्रकारे स्टायलिश दिसेल. क्रॉप टॉपच्या डिझाइनमध्ये खूप वैविध्य आहे. जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि प्रसंगानुसार निवडू शकता. दिशा पटानीपासून ते अनन्या पांडेपर्यंत, अनेकदा आपले अॅब्स फ्लाँट करण्यासाठी लो वेस्ट जॉगर्स पँटसोबत क्रॉप टॉप घालताना दिसतात.

वर्क असणारे कपडे टाळा

समर सीझनमध्ये फॅब्रिकसोबतच वर्कसंदर्भात विशेष लक्ष द्या. कमी वर्क काम असणारा ड्रेस निवडा. याशिवाय ड्रेस हलका असल्याची ही खात्री करा. वर्क ड्रेस वापरायचे असतील तर प्रिंटेड ड्रेस निवडा. वर्क केलेल्या ड्रेसमुळे गरमीची समस्या अधिक तीव्र भासेल.

- Advertisement -

कमीत कमी दागिन्यांचा वापर करा

उन्हाळ्यात ईअर रिंग्स व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट वापरू ना. कानातले हे आपल्या शरिरातील फार कमी ठिकाण व्यापतात. ज्यामुळे तुम्हाला कमी गरम होतं. पण नेकलेस, चैन, बांगड्या यासारखी ज्वेलरी घालू नका. मेटलच्या गोष्टींचा कमी वापर करा.

काय आहेत पर्याय ?

  • बाह्या नसलेले किंवा सैल बाह्यांचे टॉप
  • पूर्णपणे स्ट्रॅपलेस जाण्याची गरज नाही, परंतु स्लीव्हलेस कॅमिस आणि ऑफ-शोल्डर किंवा पफ-स्लीव्ह ब्लाऊज ही ट्रेंडी
  • शॉर्ट-स्लीव्ह बटण-अप हा आणखी एक चांगला पर्याय
  • नेहमी वापरणाऱ्या काळ्या लेगिंग टाळा
  • सुती शर्ट किंवा शॉर्ट्स वापरा
  • स्कीनी जीन्स नव्हे तर बॅगी पॅन्ट वापरा

 

- Advertisment -

Manini