घरमहाराष्ट्रपुणेVasant More : पक्ष संपवणाऱ्यांसोबत राहण्याची इच्छा नाही, राजीनाम्याचा उल्लेख करताना वसंत...

Vasant More : पक्ष संपवणाऱ्यांसोबत राहण्याची इच्छा नाही, राजीनाम्याचा उल्लेख करताना वसंत मोरे भावूक

Subscribe

पुणे – गेल्या दोन वर्षांपासून माझ्या पक्ष निष्ठेबद्दल वारंवार शंका निर्माण केली जात आहे. मी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर पुणे कोअर कमिटीने राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्याकडे नकारात्मक अहवाल पाठवला. पुणे लोकसभा मनसे लढवू शकत नाही, असे सामान्य मनसैनिकांकडून वदवून घेण्यात आले. पुणे शहरातील मनसेचे नेते हे पक्ष संघटना संपवायला निघाले आहेत. या सर्वासोबत आता यापुढे राहणे शक्य नसल्यामुळे पक्ष, संघटनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आता परतीचे दोर कापले आहेत, असे सांगत वसंत मोरे भावनिक झाले.

- Advertisement -

वसंत मोरे म्हणाले, राज ठाकरे यांनी मागील महिन्यात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा अहवाल मागितला होता. त्यात शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष पुणे लोकसभा लढवण्याच्या स्थितीत नाही, असा नकारात्मक अहवाल राज ठाकरेंकडे पाठवला. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे माझ्याबद्दल नकारात्मक माहिती पुरवली जाते.
वसंत मोरे म्हणाले की, पुणे लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे. असे सांगत मनसेमध्ये चार जणांची लोकसभा लढवण्याची इच्छा आहे, त्यापैकी एकाला राज ठाकरेंनी तिकीट द्यावे आणि निवडून आणावे. मी आता परतीचे दोर कापले आहेत.

माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष, संघटनेत योग्य स्थान दिले जात नाही. पक्षातील कोणतेही पदाधिकारी माझ्यासोबत उभं राहायला तयार नाही. परवा एका कार्यक्रमासाठी एक पदाधिकारी आले, त्यांनी मला तिथे पाहिले आणि माझ्यासोबत मंचावर येण्यासही नकार देत आल्या पावली परत निघून गेले. पक्षातील लोक जर माझ्यासोबत नसतील तर मग पक्षात कशासाठी राहायचे, असा सवाल करत आता नेत्यांचे फोन यायला लागले आहेत, असे वसंत मोरे म्हणाले.

- Advertisement -

मी एवढ्या वर्षांपासून बोलत आहे, तेव्हा कोणीही माझ्याकडे आले नाही. माझी तडफड त्यांना दिसली नाही. आता ते नेते मला फोन करत आहेत. त्यापैकी एकाही नेत्याचा मी फोन आज घेतला नाही, असेही वसंत मोरे म्हणाले. कधीपर्यंत मी फक्त माझी गाऱ्हाणी मांडत राहयची होती. मी भूमिका मांडल्यावर माझ्यावरच कारवाई होणार असेल तर कधीपर्यंत पक्षात राहायचे, असा सवाल करत वसंत मोरे यांनी पुढील भूमिका काय घ्यावी याचा निर्णय पुणेकर घेतली असे म्हटले.

शरद पवारांच्या भेटीवर वसंत मोरे म्हणाले की, ती भेट राजकीय नव्हती. मला सर्वच पक्षांकडून ऑफर आहेत. पण मी काय निर्णय घ्यायचा, कोणती भूमिका घ्यायची, याचा निर्णय पुणेकर घेतील. ते सांगतील ते मी करणार आहे, अशी भूमिका मोरेंनी स्पष्ट केली.

भारतीय जनता पक्षाकडून दबाव आहे का, या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले, भाजपकडून ऑफर नाही किंवा दमदाटीही नाही. माझ्याकडे जे काही आहे, ते स्व कष्टाने कमावलेले आहे. त्यामुळे ईडी, सीबीआय याची मला भीती नाही, असेही वसंत मोरे म्हणाले.


वसंत मोरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • मागच्या महिन्यात राज ठाकरेंनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते. त्यात पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. शहराचा निगेटीव्ह अहवाल राज ठाकरेंकडे पाठवण्यात आला.
  • माझ्याच निष्ठांवर नेहमी प्रश्न चिन्ह उभे केले जाते. पंधरा वर्षांपासून मी ज्यांच्यासोबत काम करत होतो तेच लोक माझा निगेटीव्ह अहवाल पाठवत होते.
  • आता मी नेत्यांचे फोन घेतले नाही. एवढे दिवस वसंत मोरेची तडफड तुम्हाला दिसला नाही का? माझ्या साथीदारांची पदं काढून घेतली.
  • मी परतीचे दोर कापले आहेत. राज ठाकरेंकडे लोकसभेसाठी वेळ मागितला होता. मात्र त्यांनी वेळ दिला नाही. माझा राज ठाकरेंसोबत वाद नाही. पुणे मनसे चुकीच्या लोकांच्या हातात गेला आहे. राज ठाकरे मुंबईला असतात इथे रोज या लोकांसोबत राहावे लागते, जे लोक पक्ष संपवायला निघाले आहेत, त्यांच्यासोबत राहण्याची आता इच्छा नाही.
  • मला शहरात पक्ष संघटना वाढवायची असेल तर निवडणूक लढवणं गरजेचं आहे. मात्र मला निवडणूक लढू दिली जात नाही.
  • मनसेचा पुण्याचा पहिला खासदार वसंत मोरे होऊ शकतो, हा विश्वास मला आहे. मात्र मला विरोध होतो.
  • कधी पर्यंत मी फक्त माझी गाऱ्हाणी मांडायची. मी भूमिका मांडल्यावर माझ्यावरच कारवाई होणार असेल तर कधीपर्यंत या पक्षात राहायचे, असा सवाल करत वसंत मोरे यांनी पुढील भूमिका काय घ्यावी याचा निर्णय पुणेकर घेतली असे म्हटले.
  • पुणे शहर कोअर कमिटीने पक्ष संघटना संपवण्याचे काम केले आहे, असा आरोप मोरेंनी केला.
  • भाजपाकडून ऑफर नाही किंवा दमदाटीही नाही. माझ्याकडे जे काही आहे, ते स्व कष्टाने कमावलेले आहे. त्यामुळे ईडी, सीबीआय याची मला भीती नाही, असेही वसंत मोरे म्हणाले.
  • शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. ती भेट राजकीय नव्हती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -