Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionWedding season : या गोष्टी मुलींकडे असायलाच हव्यात

Wedding season : या गोष्टी मुलींकडे असायलाच हव्यात

Subscribe

लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटले की, महिलांची लगबग पुरुष मंडळींपेक्षा अधिक दिसून येते. लग्न कोणाचेही असो, महिलावर्ग तयारी करताना खूपच उत्साहाने आणि परिपूर्णतेने करत असते. यात कोणते कपडे घालायचे, साडी की ड्रेस घालायचा, आऊटफिटवर कोणते दागिने निवडायचे?, आऊटफिटवर चप्पल कोणत्या प्रकारची सूट होईल अशी अनेक प्रश्न महिलावर्गासमोर उभे राहतात. त्यामुळे अचानक लग्न समारंभाआधी तुमचा गोंधळ उडू नये, यासाठी तुमच्या वॉडरोबमध्ये काही गोष्टी या असायलाच हव्यात.

पुढील गोष्टींचे वॉडरोबमध्ये कलेक्शन ठेवा –

साडी (Saree) 

आजकाल बऱ्याच मुलींना साडी नेसायला फार आवडते. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या कॅटेगरीमधील असाल तर तुमच्याकडे सुद्धा लग्नसमारंभात घालता येतील अशा 4 ते 5 साड्यांचे कलेक्शन असायला हवे. अशाने जर एखाद्या लग्नसमारंभाचे आमंत्रण आले तर त्यावेळी काय घालायचे हा प्रश्न तुम्हाला सतावणार नाही.

- Advertisement -

सूट (Suit)

लग्नाच्या सीझनमध्ये कमीतकमी 3 तरी हेवी डिझायनर सूट तुमच्याकडे असायलाच हवेत. हेवी डिझायनर सूट मध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतात. जसे की, पंजाबी सूट, शरारा सूट, पॅन्ट सूट. सध्या पॅन्ट सूट फार ट्रेंडिंगवर आहे. यात तुम्हाला बाजारात अनेक रंग आणि विविध डिझाइन्स मिळतील. त्यामुळे कमीत कमी 3 ते 4 सुटचे कलेक्शन नक्की करून ठेवा.

रेडिमेड गाऊन  (Readymade Gown)

तुमच्या वॉडरोबमध्ये रेडिमेड गाऊन सुद्धा असायला हवे. रेडिमेड गाऊन बाजारात सहज उपलब्ध असतात. तुमच्या तुमच्या आवडीच्या रंगाचे आणि डिझाइनचे खरेदी करू शकता. यात तुम्हाला नेटेड, हेवी डिझाइन, वेलवेट असे विविध प्रकारचे गाऊन दिसतील.

- Advertisement -

डिझायनर ब्लाउज (Designer Blouse)

साध्या साडीसोबत डिझायनर ब्लाउज फार छान आणि हटके लूक देतो. तुम्हाला लग्नात हटके लूक हवा असेल तर विविध ब्लाउजचे कलेक्शन नक्की तुम्ही वॉडरोबमध्ये नक्की कलेक्ट करायला हवे.

फुटवेअर (Footwear)

लग्नसाठी लागणारे एथनिक फुटवेअर तुम्ही करायलाच हवे. यात तुम्हाला साडी, सूट, गाऊन यासर्वांवर शोभून दिसतील असे कलेक्शन जमा करायला हवे.

 

 


हेही पहा : काजोलचं स्किन केअर रूटीन

 

 

Ediited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini