घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : द्रौपदीबाबत केलेल्या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंकडून...

Lok Sabha 2024 : द्रौपदीबाबत केलेल्या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंकडून संताप

Subscribe

मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या काळात द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रश्न पडतो, असे वादग्रस्त विधान केले होते. याचपार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या काळात द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रश्न पडतो, असे वादग्रस्त विधान केले होते. याचपार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत अजित पवारांसह भाजपा आणि महिला आयोगावर संताप व्यक्त केला आहे. (Lok Sabha Election 2024 Sushma Andharen angry over Ajit Pawars controversial statement on Draupadi)

सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये राज्यात कुठेच निवडणुका सुरू नाहीत, फक्त बारामतीत निवडणुका सुरू आहेत, अशा पद्धतीचं चित्र समोर उभं केलं जात आहे. भारतीय जनता पक्षाचा डीएन आहे त्यानुसार, जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणं लावली जात आहेत. पण बारामतीत भाजपाने एका कुटुंबात भांडणं लावली आहेत. भाजपाने नुसती कुटुंबात भांडणं लावली नाही तर त्यांनी बाई विरुद्ध बाई असा संघर्ष उभा केला. हा संघर्ष उभा करताना भाजपाच्या मेहरबाणीने महिला आयोगाचं अध्यक्ष पद टिकलेल्या महिलेने लेकीने माहेरी लुडबूड करू नये, अशा पद्धतीची मुक्ताफळे उधळली होती, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मशीनमध्ये पटापट बटन दाबा, नाहीतर…; अजित पवारांचा मतदारांना इशारा

- Advertisement -

सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: महिलांबद्दल बोलताना द्रौपदीसारखी अवस्था झाली असती की काय? अशा प्रकारचं वक्तव्य करतात, तेव्हा महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं, महिलांवर विनोद करणं, महिलांच्या संबंधाने वेगवेगळ्या द्विअर्थी संवाद साधणे हे सर्व फक्त आणि फक्त करमणुकीच्या क्षेत्रामध्ये आहे की काय असं वाटायला लागलं होतं. पण राज्याचे उपमुख्यमंत्रीच इतक्या जबाबदार पदावरून महिलांच्या संबंधाने वक्तव्य बेजबाबदारपणे करत असतील, तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीचं पॉलिटीकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपाच्या हस्तक असणारे किंवा भाजपाच्या अगदी ताकाखालचं मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेतं हे सर्वच चित्र अत्यंत दुर्दैवी आहे, असा संताप सुषणा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मशीनमध्ये पटापट बटन दाबा, नाहीतर…; अजित पवारांचा मतदारांना इशारा

काय म्हणाले अजित पवार?

इंदापूर दौऱ्यावर असताना डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल, काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला  त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात 1000 मुले जन्माला आले की त्यावेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. पण हा दर 790 पर्यंत गेला आहे. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही, असे म्हणत अजित पवार यांना सावरासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -