Wednesday, April 17, 2024
घरमानिनीReligiousलग्नात मंगळसूत्र उलटे का घालतात? 'हे' आहे कारण

लग्नात मंगळसूत्र उलटे का घालतात? ‘हे’ आहे कारण

Subscribe

हिंदू धर्मात अनेक रूढी आणि परंपरा या शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. लग्न परंपरा हीसुद्धा त्यापैकीच एक आहे. हिंदू लग्न परंपरेनुसार लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलो. हिंदू विवाह पद्धतीत मंगळसूत्राला फार महत्व आहे. हल्ली काही मुलींना लग्नानंतर मंगळसूत्र घालायला आवडत नाही. तर काहींची अजून काही वेगळी कारणं असू शकतात. पण एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की, नवीन नवरी म्हणजे लग्नात आणि लग्नानंतरच्या काही दिवस मुलीच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र असतं. जे साधारण 16 दिवसांनी सरळ केलं जातं. पण या मागचं कारण काय हे तुम्हाला माहिती आहे का? तसंच मंगळसूत्राचं महत्व काय जाणून घ्या.

मंगळसूत्र उलटं का घालतात?

मंगळसूत्रात दोन धाग्यांमध्ये काळेमणी गुंफलेले असात. मध्यभागी ४ छोटेमणी २ लहान वाट्या असतात. यातली एक वाटी माहेरची तर दुसरी सासरची असतं. दोन दोरे म्हणजे पतीपत्नीचे बंधन चार काळे मी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ असतात. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्यतंतू म्हणतात.
मंगळसूत्राच्या दोन वाट्यांपैकी एकात हळद आणि दुसऱ्यात कुंकू भरून उलटं मंगळसूत्र घातलं जातं. जेणे करून इतरांना समजतं की, महिला नुकतीच सौभाग्यवती झाली आहे. तिचं नुकतच लग्न झालं आहे. महिलांसाठी मंगळसूत्र खूपच महत्वाचे असते. नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये तर त्या महिलेचं रक्षा कवच समजलं जातं.

- Advertisement -

मंगळसूत्र उलटे घालण्यामागचे कारण

पुर्वीच्या काळी अगदी कमी वयातच मुलींचे लग्न व्हायचे. लग्न झाल्यानंतरही मुलींना वयात येण्यासाठी काही काळ बाकी असायचा. हे वय मुलीला आई बनण्यासाठी योग्य नाही त्यामुळे मुलगी वयात येणे तसेत तीची मासीक पाळी सुरू होणे अद्याप बाकी आहे हे कळण्यासाठी ती मंगळसुत्र उलटे घालायची. वयात आल्यानंतर ते सरळ करण्यात यायचे. हे खरंतर मंगळसुत्र उलटे घालण्यामागचे कारण आहे.

मंगळसूत्राचं वैज्ञानिक महत्व

वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास, मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहते. तसेच या मंगळसूत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी उत्तम ठरते. याचं कारण आहे की, त्या वाट्या सोन्याच्या असतात. सोनं महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. म्हणूनच नववधूचं मंगळसूत्र मोठ बनवलं जातं. सोने आणि चांदी हे महिल्यांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. मंगळसूत्रातले काळे मोती हे महिलांना राहू, केतू, शनिच्या दुष्प्रभावापासून वाचवतो. पण आता महिला आपल्या आवडीनुसार लहान मोठं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइनचे मंगळसूत्र वापरतात.

- Advertisment -

Manini