Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthबाळाच्या डोळ्यांना काजळं लावताय तर होतील 'या' समस्या

बाळाच्या डोळ्यांना काजळं लावताय तर होतील ‘या’ समस्या

Subscribe

भारतात बाळं जन्माला आल्यानंतर त्याच्या डोळ्यांना काजळ लावले जाते. ही प्रथा आपल्याकडे वर्षानुवर्ष सुरु आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा त्यांना नजर लागते किंवा ते सुंदर दिसतात तेव्हा त्यांना काजळं लावलं जाते. परंतु तुम्हाला हे माहिती नसते की, त्यांच्या डोळ्यांवर याचा किती परिणाम होऊ शकतो. तर जाणून घेऊयात बाळांना काजळं लावल्याने नक्की काय समस्या होऊ शकतात याच बद्दल अधिक.

-डोळ्यांतून पाणी येणे
बाळांना जेव्हा तुम्ही काजळं लावता तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. असे या कारणास्तव होते की, काजळं हे डोळ्यांच्या कोपऱ्यावर येऊन जमा होते.

- Advertisement -

-डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो
लहान मुलांच्या डोळ्यांना अधिक काजळं लावत असेल तर त्याच्या डोळ्यांच्या कर्नियाला नुकसान पोहचू शकतो. यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.

-खाज येणे
डोळ्यांना काजळ लावल्याने बाळांच्या डोळ्यांना खाज येऊ शकते. यामुळे त्यांच्या मेंदूच्या विकासामध्ये सुद्धा समस्या येऊ शकते.

- Advertisement -

-इंन्फेक्शन
बाळांचे डोळे हे नाजुक असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांच्या डोळ्यांना बोटाने काजळ लावता तेव्हा इंन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. यामुळे त्यांच्या डोळ्यांना काजळं लावू नये.

-स्किन इंफ्केशन
काही वेळेस मुलांच्या डोळ्यांना काजळं लावताना ते हातावर थोडं घेऊन लावले जाते. यामुळे हाताच्या त्वचेच्या माध्यमातून इंफेक्शन होऊ शकते.

-नर्वस सिस्टिमवर परिणाम
काजळंमध्ये लेड असते, जे बाळांसाठी धोकादायक ठरु शकते. अशातच तुम्ही तुमच्या बाळाच्या डोळ्यांना काजळं लावत असाल तर त्याच्या शरिरात लेड जाऊ शकते. परिणामी त्यांच्या नर्वस सिस्टिमवर परिणाम होऊ शकतो.


हेही वाचा- Baby massage tips: बाळाला मसाज करताना अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini