Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthऋतूमध्ये बदल होताच बाळाच्या नाजूक त्वचेची 'अशी' घ्या काळजी

ऋतूमध्ये बदल होताच बाळाच्या नाजूक त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Subscribe

जसे ऋतूमध्ये बदल होतात तसेच आपल्या आरोग्यावरही बदल पाहायला मिळतात. विशेष म्हणजे अशावेळी बाळांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. बदलत्या ऋतूमुळे बाळाच्या नाजूक त्वचेवर लगेच परिणाम होतो. संसर्ग झाल्यास तापही येऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात लहान बाळांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.

लहान बाळांची अशी घ्या काळजी

misundelse kaos I navnet newborn baby skin care Recept karton Aktiv

- Advertisement -
  • अंघोळ घालण्यापूर्वी सूर्यफूल आणि एरंडेल यांचं मिश्रण असलेल्या तेलाने बाळाचं मालिश करावं. त्यामुळे त्वचा मुलायम होते.
  • ज्या ठिकाणी बाळाला आंघोळ घालणार असाल ती जागा थंड तर नाही ना याची काळजी घ्या. तसेच तिथली जागा उबदार आहे याची खात्री करून घ्या.
  • बाळाला झोपवताना गादीवर किंवा उशीच्या जवळ झोपवावं.
  • हिवाळ्यात बाळाच्या टाळूची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे बाळाच्या टाळूवर खपल्या दिसतात. त्या हाताने किंवा ब्रशने एकदम काढायला जाऊ नका. आंघोळीच्या वेळी एक मुलामय पंचा पाण्यात बुडवून, पिळून घ्या. गरम पंचाने बाळाची टाळू थोडावेळ झाकून ठेवावी. असं दररोज केल्याने त्या खपल्या आपोआप पडायला सुरुवात होईल.

Winter Skin Care 101 for Babies and Toddlers

  • थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बाळाला स्पंज बाथ घालणंही केव्हाही उत्तम ठरतं. त्याच्या अंगावर पाणी घालण्याऐवजी त्यांला स्पंजने पुसून घ्यावं. म्हणजे बाळाला थंडी लागत नाही.
  • बाळाच्या केसांसाठी बेबी शॅम्पू आणि त्वचेसाठी मृदू-मुलायम साबणाचा वापर करावा.
  • आंघोळ घालून झाल्यावर बाळाचं शरीर पंचा किंवा सुती फडक्याने व्यवस्थित कोरडे करा.
  • बाळाच्या ओठाची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तिला पेट्रोलियम जेली किंवा बेबी लोशन लावावं. म्हणजे त्यांचे ओठ कोरडे पडणार नाहीत. ते मुलायम राहतील.
  • बाळाला ताप येत असेल तर लहान बाळ लघवीवाटे शरीरातील पाणी सतत बाहेर टाकतात. तेव्हा त्यांची त्वचा कोरडी कशी राहील याकडे लक्ष द्या. मधूनमधून त्यांना पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडरीचं पाणी पाजावं. बाळ जेवत असेल तर त्याला फळांचा ज्युस पाजावा.

 


 हेही वाचा :   मुलांना शिळ्या कणकेच्या पोळ्या देणं घातक

- Advertisment -

Manini