Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthMonsoon Health : पावसाळ्यात 'असा' असावा आहार

Monsoon Health : पावसाळ्यात ‘असा’ असावा आहार

Subscribe

पावसाळयात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. ज्यामुळे त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात. तसेच पावसाळ्यात आपली सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते ज्यामुळे आपल्याला अशक्तपणा सारखा येत असतो. आणि यामुळेच शरीरात अधिक पोषक तत्वांची कमतरता भासते. पावसाळ्यात खोकला, सर्दी आणि ताप येणे हे अगदी सामान्य आहे. पण आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला पावसाळ्यातील आजार होतात.

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अशा वेळी असे काही पदार्थ आहेत जे आपली प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून, आपण ते आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत. अशातच असे काही पदार्थ देखील आहेत ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. चला जाणून घेऊया आपण कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावे.

- Advertisement -

10 behaviors for healthy weight loss - Harvard Health

1. हिरव्या भाज्यांचा समावेश करा

हिरव्या भाज्यांचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. तसेच पावसाळ्यात स्वच्छ आणि चांगल्या जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाव्यात. यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जे तुम्हाला तंदुरुस्त ठेवतील आणि यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल ज्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.

- Advertisement -

2. बाहेरचे अन्न खाऊ नका

पावसाळ्यामध्ये पाणीपुरी, भेळ पुरी इत्यादी बाहेरचे पदार्थ खाण्याची खूप इच्छा असते पण मनावर नियंत्रण ठेवावे लागते. कारण या पदार्थांमध्ये काही जीवाणू असू शकतात ज्यामुळे आपल्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो. अशातच हे पदार्थ जर का तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे पदार्थ घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल फूड या प्रकारे बनवू शकता.

3. आयुर्वेदिक काढे किंवा चहा

पावसाळ्यात आल्याचा चहा बनवा. तसेच लसूण आणि दालचिनी यांसारख्या काही आयुर्वेदिक पदार्थांपासून तुम्ही घरी याचे काढे देखील बनवू शकता. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला पावसाळ्यात निरोगी राहण्यास मदत होईल.

4. मासे खाऊ नका

पावसाळा ऋतूमध्ये माशांचा प्रजननचा काळ असतो. आणि म्हणूनच मासे खाल्ल्याने पोटात त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या ऋतूत मासे खाणे टाळावे. जेणेकरून पावसाळ्यातील माश्यांमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

5. पावसाळ्यात करा घगूती उपाय

पावसाळ्यात सर्दी-खोकला यांसारखी समस्या असल्यास कच्चे आले खाल्ल्याने लगेच आराम मिळतो. तसेच घसा कोरडा पडत असेल किंवा घसा दुखत असेल तर कोमट पाण्याने गार्गल करा. यामुळे घश्याला आराम मिळेल. अशातच पावसाळयात ताप लगेच येतो. आणि हा ताप दूर करण्यासाठी तुळस, मध आणि आले पाण्यात उकळून प्यावे. महत्वाचे म्हणजे या ऋतूत गहू, हरभरा डाळ आणि भाज्या अधिकाधिक खाव्यात. ज्यामुळे शरीर हेल्दी राहील.


हेही वाचा :  तुमच्या शरिरात दररोज जाताहेत ‘हे’ टॉक्सीन

- Advertisment -

Manini