दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. यंदा महाशिवरात्री 8 मार्च साजरी केली जाईल. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करुन महादेवाचे मनोभावे स्मरण करतो. त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीला केवळ सास्विक, शुद्धा आहार कारावा. शिवाय जर तुम्ही उपवास करत असाल तरीही खाण्याबाबत काही नियमांचे पालन करायला हवे.
उपवासात करा ‘या’ पदार्थांचे सेवन
- महाशिवरात्रीच्या उपवासात फळांचे अधिक सेवन करावे यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
- तुम्हाला फळं खायला आवडत नसतील तर तुम्ही फळांचा रस किंवा दूध, दही, लस्सी पिऊ शकता.
- तुम्ही उपवासात काजू, बदाम, पिस्ता हे ड्रायफ्रुट्स देखील खाऊ शकता.
- तसेच साबुदाणा खिचडी, चिवड्याचे देखील तुम्ही उपवासात सेवण करु शकता.
- उपवासात जास्त तळलेले पदार्थ खाऊ नये.
महाशिवरात्रीच्या दिवशी करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन
- जे लोक महाशिवरात्रीला उपवास करत नाहीत त्यांनी सात्विक पदार्थांचे सेवन करावे.
- या दिवशी दारु पिऊ नये आणि मांसाहार करु नये.