Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthप्रेगन्सीमध्ये जेवणाच्या वासानेही उलटी होते?

प्रेगन्सीमध्ये जेवणाच्या वासानेही उलटी होते?

Subscribe

प्रेग्नसीमध्ये उलट्या आणि मळमळ ही खूप सामान्य लक्षणे आहेत. जवळपास प्रत्येक महिलेला मॉर्निंग सिकनेस हा जाणवतोच आणि या काळात महिला कोणताही पदार्थ खायला टाळतात. प्रेगन्सीच्या पहिल्या तीन महिन्यात काही पदार्थ खाल्यानंतर उलट्या सुरु होतात अशी अनेक प्रेग्नेंट महिलांची तक्रार असते. पण यामागचे कारण अनेकजणींना ठाऊक नसते. तुम्हीही प्रेग्नंट असाल आणि अन्नपदार्थ पाहिल्यावर तुम्हाला उलटीसारखे होत असेल? तर ही बातमी पूर्ण वाचा.

जेवणाच्या वासाने उलटी का होते?

एका संशोधनानुसार मॉर्निंग सिकनेसचे काही फायदे आहेत. हे आपल्या शरीराची संरक्षणयंत्रणा म्हणून काम करते. आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी हानिकारक असणारे अन्न आणि गंध नाकारते. यामुळे अन्न पाहून किंवा वास घेऊन उलट्या होतात.

मिसकॅरेज होत नाही

ज्या महिलांना पहिल्या तीन महिन्यात उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो. त्यांना मिसकॅरेज आणि मृत बाळंतपण होण्याची शक्यता फारच कमी असते. मॉर्निंग सिकनेस हा प्रेग्नसीचा एक नैसर्गिक भाग आहे. जो प्रत्येक महिलेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो.

मॉर्निंग सिकनेस कधी सुरु होतो?

मॉर्निंग सिकनेस हे गर्भवती होण्याचे पहिले लक्षण असू शकते. याशिवाय मॉर्निंग सिकनेस आणि मळमळीची लक्षणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात सुधारतात. पण, काही महिलांच्या बाबतीत ते पुढील काही महिने सुद्धा असू शकतात.

भूक आणि मळमळीची समस्या एकत्र का जाणवते?

Study reveals cause of extreme nausea in pregnancy

अनेकदा महिलांना प्रेग्नसीमध्ये भूकही लागते आणि मळमळीची समस्याही जाणवते. पण, हे सामान्य आहे. अशावेळी डॉक्टर थोडे थोडे खाण्याचा सल्ला देतात.

यावर उपाय काय कराल?

जर तुम्हाला भूक लागली असले तर झोपण्यापूर्वी किंवा उठताना काहीतरी हलके खाण्याचा प्रयन्त करा. यात तुम्ही टोस्ट किंवा स्नॅक्स खाऊ शकता.

 

- Advertisement -

 


हेही वाचा ; Baby Plan करण्याआधी आहारात करा ‘4’ न्यूट्रीयंट्सचा समावेश

- Advertisement -

 

- Advertisment -

Manini