घरपालघरउलट्या,जुलाब झालेल्या विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा

उलट्या,जुलाब झालेल्या विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा

Subscribe

या विद्यार्थिनींना 24 ते 48 तास डॉक्टरांनी केवळ उपचाराचा भाग म्हणून निगराणीत ठेवण्यात आले असल्याचे शालेय व्यवस्थापनाने सांगितले आहे.

जव्हार: तालुक्यातील गोरठण येथे निवासी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू केले असून, या विद्यालयात ६ वी ते १० वी च्या एकूण १५० आदिवासी मुली शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील १६ विद्यार्थिनींना गुरुवारी अचानक ताप, उलट्या व जुलाब चा त्रास जाणवायला लागल्याने, शालेय प्रशासनाने काहीच वेळ न दवडता जव्हारच्या पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयात या मुलींना उपचारासाठी दाखल केले होते. प्रथमदर्शनी विद्यार्थिनी जुनाट बोरे व चिंचा खाऊन तसेच दूषित पाणी प्यायल्याने आजारी पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे. मात्र, अन्नातून विषबाधा झाली नसल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. उपचारानंतर त्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले. या विद्यार्थिनींच्या आरोग्यात सुधारणा झाली असून, अन्नातून जर विषबाधा झाली असती तर ती सर्व शाळेतील मुलींना झाली असती, असे सांगण्यात आले. या विद्यार्थिनींना 24 ते 48 तास डॉक्टरांनी केवळ उपचाराचा भाग म्हणून निगराणीत ठेवण्यात आले असल्याचे शालेय व्यवस्थापनाने सांगितले आहे.

शाळेच्या माध्यमातून शिक्षकच नव्हे तर प्रत्येक कर्मचारी हा सर्वच मुलींना आपल्या मुलांप्रमाणे जपत आले आहे. त्यांच्या सर्व बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असते. शिवाय, पालक वर्ग देखील चांगल्या प्रकारे लक्ष देत असतात.
– कल्पना मुकणे, मुख्याध्यापिका, कस्तुरबा गांधी बालिका, जव्हार

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या वतीने शाळेतील संपूर्ण विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली आहे. शिवाय जुलाब उलट्या झालेल्या मुलींचे स्टूल सँपल तपासणी करीता पाठविण्यात आले आहे.त्याच बरोबर पाणी तपासणी साठी देखील पाठविले आहे,अंदाजानुसार ही अन्नातून विषबाधा सारखा प्रकार वाटत नाही.
डॉ. भरतकुमार महाले, वैद्यकीय अधिक्षक, पतंग शहा उपजिल्हा रुग्णालय, जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -