घरपालघरवाड्यात गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू 

वाड्यात गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू 

Subscribe

मात्र उपचारा दरम्यान तिचाही मृत्यू झाला. बाळ व बाळंतीण दोघेही दगावले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

वाडा:  विक्रमगड तालुक्यातील अतिदुर्गम अशा सावरोली या गावातील एका 19 वर्षे महिलेची सातव्या महिन्यात प्रसूती झाली.त्यानंतर बाळ जागीच दगावले.सदर महिलेची प्रकृती खालावल्याने तिला वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचाही मृत्यू झाला. बाळ व बाळंतीण दोघेही दगावले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. तनुजा पारधी( वय 19) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.  अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  विक्रमगड तालुक्यातील सावरोली या गावात तनुजा पारधी ही महिला आपल्या कुटुंबासह राहत होती.ती गरोदर होती तिला सातवा महिना होता. मंगळवारी तिला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने रात्रीच्या सुमारास तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र कमी महिन्याचे बाळ असल्याने काही वेळातच ते दगावले. मातेलाही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सदर महिलेने कशीबशी रात्र जागून काढली. पण तिचीही तब्येत अधिकच खालावत गेली.बुधवारी सायंकाळी चार वाजता तिला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील स्त्रीरोग तज्ञ डाॅ. स्वप्निल राऊत यांनी तिच्यावर तातडीने उपचार देखील सुरू केले. पण प्रकृती गंभीर झाल्याने तनुजाचा मृत्यू झाला. बाळ व बाळंतीण दोघेही दगावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, यासंदर्भात वाडा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुनील भडांगे यांच्याशी संपर्क साधला असता रूग्णालयात दाखल करण्याअगोदर तनुजाची प्रकृती गंभीर होती उपचाराला ती प्रतिसाद देत नव्हती दरम्यान तिचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -